Zohran Mamdani New york Mayor : ट्रम्प यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, भारतीय वंशाचा माणूस बनला न्यू यॉर्क शहराचा महापौर

Zohran Mamdani New york Mayor Election : भारतीय वंशाचा व्यक्ती न्यू यॉर्क शहराचा महापौर बनला आहे. न्यू यॉर्क शहराचं जगात एक वेगळं स्थान आहे. अमेरिकेच्या अर्थकारणात या शहराने महत्वाची भूमिका बजावली आहे. अशा शहराचा महापौर बनण्याचा मान भारतीय व्यक्तीला मिळू नये म्हणून ट्रम्प यांनी आपली ताकद पणाला लावलेली. मात्र, त्याचा काही एक उपयोग झाला नाही.

Zohran Mamdani New york Mayor : ट्रम्प यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, भारतीय वंशाचा माणूस बनला न्यू यॉर्क शहराचा महापौर
Trump-Mamdani
| Updated on: Nov 05, 2025 | 8:42 AM

अमेरिकेतील सर्वात मोठं आणि प्रभावशाली शहर न्यू यॉर्क मध्ये नवीन इतिहास रचला गेला आहे. भारतीय वंशाचे डेमोक्रॅट उमेदवार जोहरान ममदानी यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह जोहरान ममदानी हे मागच्या 100 वर्षातील न्यू यॉर्कचे सर्वात तरुण, भारतीय वंशाचे पहिले आणि पहिले मुस्लिम महापौर बनले आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू यॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. त्यांनी जोहरान ममदानी यांना वारंवार टार्गेट केलं. धमक्या दिल्या, टीका केली. पण, याचा काहीएक परिणाम झाला नाही. न्यू यॉर्कच्या मतदारांनी जोहरान ममदानी यांच्यावर विश्वास दाखवत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला. न्यू यॉर्क हे फक्त अमेरिकेतीलच नाही, तर जगातील एक प्रभावशाली शहर आहे. इथे अनेक सेलिब्रिटी, मोठ्या बिझनेसमन्सच वास्तव्य असतं. अमेरिकेच्या अर्थकारणात या शहराची अत्यंत महत्वाची भूमिका असते. अशा ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदारांनी नाकारणं हा त्यांच्यासाठी सुद्धा एक धक्का आहे.

निवडणूकपूर्व मतदान सर्वेक्षणात ममदानी आघाडीवर होते. आता रिझल्टने त्यावर शिक्कामोर्तब केलय. ममदानी हा प्रसिद्ध फिल्ममेकर मीरा नायर यांचा मुलगा आहे. जोहरान ममदानीच्या विजयाकडे न्यू यॉर्कच्या राजकारणात नवीन पिढी आणि नव्या विचारांचा उदय म्हणून पाहिलं जात आहे. या विजयाने सर्वात मोठा झटका बसलाय तो डोनाल्ड ट्रम्प यांना. कारण ते सतत ममदानी याच्याविरोधात वक्तव्य करत होते. ट्रम्पनी आधी त्यांना वेडा कम्युनिस्ट म्हटलं होतं. निवडणुकीआधी इशारा दिलेला की, ममदानी जिंकले तर न्यू यॉर्कची फेडर फंडिंद कमी करणार.

किती लाख लोकांनी मतदान केलं?

न्यू यॉर्क असाही डोमोक्रॅट्सचा गड मानला जातो. ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाने हा किल्ला अजून अभेद्य बनवला आहे. आता यावर ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. न्यू यॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत 17 लाखापेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं. मागच्या तीन दशकात महापौर पदाच्या निवडणुकीत झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.

ममदानी यांचं भारताशी काय कनेक्शन?

युगांडाच्या कंपालामध्ये ममदानी यांचा जन्म झाला. जोहरान ममदानी वयाच्या सातव्या वर्षी न्यू यॉर्क मध्ये आले. नंतर तिथले नागरिक बनले. त्यांची आई मीरा नायर प्रसिद्ध भारतीय अमेरिकन फिल्म निर्माती आहे. त्यांचे वडील ममदानी कोलंबिया विश्वविद्यालयात प्रोफेसर आहेत.