वाघाला प्रेमाने कुरवाळणे 23 वर्षांच्या तरुणाला पडले महागात, पिंजऱ्याच्या आतून चिडलेल्या वाघाने घेतला जीव

हात कापून टाकावा लागेल, असे डॉक्टरांनी सुचवले, मात्र जोसने त्याला नकार दिला. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. जोस हा स्वता डायबिटिसचा रुग्ण होता. त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

वाघाला प्रेमाने कुरवाळणे 23 वर्षांच्या तरुणाला पडले महागात, पिंजऱ्याच्या आतून चिडलेल्या वाघाने घेतला जीव
Caretaker died in tiger attack
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 5:28 PM

नवी दिल्ली – वाघाची देखरेख करणाऱ्या केअरटेकरलाच वाघावर प्रेम दाखवणे चांगलेच महागात पडल्याची घटना घडली आहे. पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघाच्या अंगावर प्रेमाने हात फइरवत असताना, भुकेल्या वाघाने या केअरटेकरवरच हल्ला केला. यात हा केअरटेकर गंभीर जखमी झाला होता, हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. घटना मॅक्सिकोच्या पेरिबान इथली आहे. इथे असलेल्या एका खासगी प्राणी संग्रहालयात देखरेख करणाऱ्या तरुणाने खाऊ घालण्यासाठी वाघाला पिंजऱ्यातून त्याच्या जवळ बोलावले. वाघ भुकेला होता, खाण्यासाठी तो पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या केअरटेकरजवळ आला. त्यानंतर या केअरटेकरने वाघाच्या गळ्यावरुन प्रेमाने हात फिरवण्यास सुरुवात केली. मात्र भुकेल्या असलेल्या वाघाचा संताप झाला आणि त्याने या केअरटेकर तरुणाचा उजवा हातावर त्याचा पंजा जोरात रोवला.

केअरटेकर जोस भीतीने गारठला

या केअरटेकरचे नाव जोस जी जीसस असे होते. तो अवघ्या 23 वर्षांचा होता. वाघाने त्याच्या उजव्या हतावार हल्ला केल्याने तो घाबरला आणि वेदनेने विव्हळू लागला. वाघाने पंजा मारुन त्याचा उजवा हात ओढला आणि तोंडाजवळ आणला. वाघाने त्याच्या टोकदार दाताने या तरुणाचा हातच फाडला. या तरुणाच्या हातातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या होत्या.

गोंधळातच नेले हॉस्पिटलमध्ये

यानंतर भीतीने गारठलेला जोस जोरजोराने ओरडू लागला. आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी हिमतीने त्याला वाघाच्या तावडीतून सोडवले. याच गडबड गोंधळात त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हात कापून टाकावा लागेल, असे डॉक्टरांनी सुचवले, मात्र जोसने त्याला नकार दिला. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. जोस हा स्वता डायबिटिसचा रुग्ण होता. त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हल्ल्याचा व्हिडीओही आला समोर

या खासगी प्राणीसंग्रहालयाच्या मालकाने या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर रीलिज केला आहे. या मालकाने अनेक प्राणी आपल्य़ा संग्रहालयात ठेवले होते. या प्रकरणात जोसकडून बेपर्वाई झाल्याचा आरोप या प्राणी संग्रहालयाच्या मालकाने केला आहे. जोस याची सर्व वैद्यकीय बिले भरले असल्याचेही या मालकाने सांगितले आहे. तसेच प्राणी संग्रहालयाकडे सर्व आवश्यक परवाने होते, असेही मालकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता या मालकाकडे वाघ ठेवण्याची परवानगी होती का, याचा तपास यंत्रणा करत असल्याची स्थानिक माध्यमांची माहिती आहे. या प्राणीसंग्रहालयात एक सिंह आणि एक मगर असल्याचेही सांगण्यात आले आहे.