
भारतातील सर्वात खतरनाक 5 रस्ते मार्ग तुम्हाला माहिती आहेत का ? हे रस्ते मार्ग इतके धोकादायक आहेत की येथे सतत अपघात होतच राहातात. या क्षेत्राच्या आसपास राहणाऱ्यांना या मार्गावरुन नेहमीच जावे लागते. तुमचे नशीब चांगले असेल तरच या रस्त्यांवर तुम्ही सही सलामत रस्ता पार करु शकता..
हे आहेत भारताचे 5 सर्वात धोकादायक रस्ते
आज आपण भारतातील सर्वात 5 धोकादायक मार्गांसंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. हे रस्ते इतके धोकायदायक आहेत की या रस्त्यांवर दरवर्षी सुमारे 13 लाख लोक रस्ते दुर्घटनेत मृत्यूमुखी होतात. जागतिक आरोग्य संघटनेने साल 2011-2021 ला ‘रस्ते सुरक्षा दशक’ घोषीत केले आहे. चला तर पाहूयात भारताचे 5 सर्वात धोकादायक रस्ते कोणते ते पाहूयात..
#1. खारदुंग ला
भारताच्या 5 सर्वात धोकादायक रस्त्यांच्या विचार केला तर सर्वात पहिला क्रमांक ‘खारदुंग ला’ चा येतो. या देशातील सर्वात धोकादायक रस्ता मानले गेले आहे.18,380 फूट उंचावर वसलेल्या या रस्त्याला जगातील सर्वात धोकादायक रस्ता मानला गेला आहे. या रस्त्यावर तापमान अत्यंत कमी आणि ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असते. खारदुंग ला पास हा लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्यामध्ये आहे.
khar dung la
#2. झोजीला
झोजीला पास (Zoji La Pass) हा लडाखमधील कारगिल जिल्ह्यात आहे आणि तो श्रीनगर आणि लेह या शहरांना तो जोडतो. यास देखील भारताचा सर्वात धोकादायक मार्ग म्हटले गेले आहे. हा रस्ता लेहवरुन श्रीनगर जाताना 11000 फूट उंचावर तयार केलेला आहे. येथून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. हा रस्ता मातीने भरलेला असतो. बर्फ पडल्यानंतर तो आणखीन धोकादायक बनतो.
Zoji La Pass
#3. लेह
मनाली हायवे हा देशातील सर्वात सुंदर मार्गापैकी एक आहे. हा मार्ग दिसायला सुंदर आहे मात्र येथून प्रवास करणे तितकेच धोकादायक आहे. हा हायवे दोन्ही बाजूंना पर्वतांनी घेरलेला आहे. येथे रस्ता बर्फाने झाकलेला असतो. त्यामुळे येथे प्रवास करणे खूपच धोकादायक असते.
matheran road
#4. माथेरान
हा रस्ता नेरळ ते माथेरान जाताना लागतो. येथे जाताना देखील वळणे भीतीदायक आहे. हा रस्ता गुळगुळीत निसरडा असल्याने येथे अपघात होत असतात. या रस्त्यावरुन जाताना वाहन चालवताना काळजी घ्यावी लागते.
#5. किश्वर-कैलाश रोड
हा एका लेनचा रस्ता आहे. यावर वाहन चालवताना धोका उत्पन्न होऊ शकतो. किश्वर-कैलाश रोडच्या एका बाजूला दरी आणि दुसरीकडे डोंगर आहेत. हा रस्ता एका पर्वतावर तयार करण्यात आला आहे. या मार्गावार होणाऱ्या अपघातांमुळे लोक येथे जाण्यास नाखुश असतात. येथे चढण इतकी खतरनाक आहे की एका चुकीने जीवनास मुकावे लागते.