विमान प्रवासात ‘Mayday’ शिवाय आणखी कोणते कोड वापरतात ? ATC ला विमान हायजॅक झाल्याचे कसे कळते ?
विमान प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच तो संवेदनशीलही आहे. उड्डाणादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विशेष कोड वापरले जातात.

विमानाचा प्रवास जितका रोमांचक असतो तितकाच तो संवेदनशील असतो. उड्डाणा दरम्यान कोणत्याही आपात्कालिन स्थितीला हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीयपातळीवर काही विशेष कोडचा वापर केला जातो. अहमदाबाद विमान अपघाताच्या वेळी एअर इंडियाच्या पायलटने ‘Mayday’ या कोडचा वापर केला होता. परंतू दुर्देवाने हा अपघात इतक्या कमी वेळात झाला की काहीही करता आले नाही. या अपघातात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एकूण २६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. आता विमान उड्डाण जगतात कोण-कोणते कोड पायलट वापरतात याविषयी पाहूयात…
विमानात उड्डाण करताना ते कायम एटीसीच्या ( एअर ट्रॅफीक कंट्रोल) संपर्कात असते. हा संपर्क तुटला तर विमानाचा अपघात झाल्याचे समजले जाते. त्यामुळे एटीसीशी संवाद होणे खूपच महत्वाचे असते. वैमानिक काही आपात्कालिन स्थिती घडली तर एटीसीच्या अधिकाऱ्याशी कोडवर्डमध्ये संवाद साधत असतो. ‘Mayday’ हा कोडवर्ड तर खूपच प्रसिद्ध आहे. परंतू याशिवाय देखील अनेक कोडवर्ड आहेत. ज्यांचा प्रयोग पायलट्स आणि एअर ट्रॅफीक कंट्रोलर यांच्यात आणीबाणीच्या स्थितीत होत असतो.
‘Mayday’हा एक आंतरराष्ट्रीय कॉल आहे. ज्याचा प्रयोग कोणत्याही प्राणघातक आपात्कालिक स्थितीत केला जातो. जसे इंजिन्सचे फेल होणे, विमानात आग लागण्याचा दुर्घटनेचा संशय येणे. तेव्हा पायलट तीन वेळा “Mayday, Mayday, Mayday” असे एटीसीला सांगतो.त्यामुळे कोणताही भ्रम न रहाता योग्य माहीती कळते, पुढील निर्णय घेणे सोपे जाते.
जर परिस्थिती इतकी गंभीर नसेल की जीवाचे नुकसान होणार असेल तेव्हा पायलट ‘Pan-Pan’ कोडचा वापर करतात. याचा अर्थ विमानाला तातडीने मदतीचे गरज आहे. सध्याचा जीवाचा धोका नाही.
जर विमानाला कोणी हायजॅक केलेले असेल तर पायलट थेट एटीसीला सुचना देत नाही, तर याची एक सिक्रेट मार्ग असतो. ट्रान्सपोंडर कोड ‘7500’ सेट करणे, याचा संकेत विमानाला हायजॅक केल्याचे समजते. एटीसीला हा कोड मिळताच एसटीसीचे अधिकारी समजतात की विमानाचे अपहरण झालेले आहे.
7600: रेडियो फेल झाल्यानंतर हा कोड वापरला जातो.
7700: सामान्य आपात्कालिन स्थितीसाठी हा कोड वापरला जातो.
या विविध कोडच्या मदतीने एअर ट्रॅफीक कंट्रोल वेळेत पावले उचलते.आणि विमानातील प्रवाशांची काळजी घेण्यासाठी विमानतळावर यंत्रणांना सावध करीत असते.
