Election Deposit | निवडणुकीत डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय रं भाऊ?

| Updated on: Mar 09, 2022 | 8:58 PM

जर एखादा उमेदवार लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवत असेल तर त्याला लोकप्रतिनिधी कायदा, 1951 अन्वये निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम ही डिपॉझिट म्हणून जमा करावी लागत असते. याला आगाऊ किंवा जामीन रक्कम असेही म्हणतात.

Election Deposit | निवडणुकीत डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय रं भाऊ?
election deposit
Follow us on

मुंबईः निवडणुकींच्या (Election) काळात अनेकदा आपण जाहीर सभांमधून नेते मंडळींना ऐकमेकांना आव्हान देताना बघत असतो. ‘या निवडणुकीत तुझं डिपॉझिटच जप्त होणार’ असही काही वेळा कानावर पडत असतं. तसेच निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याला का बरं इतक मानहानीकारक (Defamatory) मानल जात, असाही प्रश्‍न अनेकांच्या मनात पडत असतो. मग डिपॉझिट म्हणजे काय?, ते किती जमा करावं लागतं, ते केव्हा जप्त होतं असे अनेक प्रश्‍न सामान्यांच्या मनात असतात. सध्या देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी लागणार आहेत. निवडणूक निकाल लागल्यानंतर एक गोष्ट सर्वाधिक बोलली जाते ती म्हणजे डिपॉझिट (deposit) जप्तीची… लोकप्रतिनिधी कायदा, 1951 अन्वये जर एखादा उमेदवार लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवत असेल तर त्याला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करावी लागते. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ही रक्कम वेगवेगळी असते.

कोणत्या निवडणुकीत किती डिपॉझिट

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सुरक्षेचे प्रमाणही वेगवेगळे असते. एवढेच नाही तर आरक्षणानुसार डिपॉझिटची रक्कमही बदलते.

1) लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला सुरक्षा ठेव म्हणून 25,000 रुपये जमा करावे लागतात. ही रक्कम सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारासाठी आहे. त्याच वेळी, एसटी, एससी श्रेणीतील उमेदवारांना 12,500 रुपये जमा करावे लागतात.

2) विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला 10 हजार रुपये आणि एसट, एससी प्रवर्गातील उमेदवाराला 5 हजार रुपये जमा करणे आवश्यक आहे.

3) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक प्रवर्गातील उमेदवाराला समान रक्कम जमा करावी लागते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला 15,000 रुपयांची रक्कम जमा करावी लागेल.

डिपॉझिट कधी जप्त होते?

बीएस अहवालानुसार, निवडणूक आयोग नावनोंदणी करणाऱ्या उमेदवारांकडून निश्चित रक्कम जमा करतो. निवडणुकीत ठराविक मते न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केले जाते. मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला 16.66% मते मिळणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले जाते. उदाहरणार्थ, जर विधानसभेच्या जागेवर 2 लाख मते असतील आणि त्या जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 33,332 पेक्षा कमी मते मिळाली असतील, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले जाते. त्याचबरोबर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवाराला 1/6 मते मिळणे आवश्यक आहे.

रक्कम परत मिळते?

उमेदवाराला सिक्युरिटी डिपॉझिट वाचवण्यासाठी 1/6 पेक्षा जास्त मते मिळवावी लागतात, परंतु जर तो उमेदवार विजयी झाला तर सिक्युरिटी डिपॉझिट त्याला परत केले जाते. याशिवाय 1/6 पेक्षा जास्त मते मिळविणाऱ्या उमेदवाराला ही रक्कम परत केली जाते. याशिवाय उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास त्याला रक्कम परत मिळते.

संबंधित बातम्या

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

Maharashtra News Live Update : आजचं भाषण टीझर, पिक्चर 2 एप्रिलला शिवतीर्थावर

Raj Thackeray : महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या? राज ठाकरेंनी सांगितलं कारण; मुख्यमंत्र्यांवर निशाणा