पुणे : आज मनसेला 16 सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी (Raj thackeray Speech) तब्बल दोन वर्षांनंतर त्यांच्या खास शैलीत धडाडीने भाषण केलं. त्यावेळी त्यांनी नेत्यांचा तर समाचार घेतलाच, मात्र यावेळी त्यांनी राज्यपालांनाही (Governor Bhagat Singh Koshyari) सोडलं नाही. राज्यपालांची नक्कल करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chatrapati Shivaji mahraj) राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचार राज ठाकरेंनी समाचार घेतला आहे. हे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष तुम्हाला जातीत गुंतवून ठेवत आहेत. शिवाजी असं नुसतं नाव ऐकू आलं की हा माणूस उठून जायचा, काहीतरी सापडेल या आशेने, असे म्हणत हे परवा आमचे राज्यपाल. काहीसमज बिमज आहे का ? मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो, बघितलं ना कसंय ते? असे म्हणत थोड मागे झुकत, वाकडं होत राज ठाकरेंनी राज्यपालांची हुबेहुब नक्कल केली. त्यानंतर त्याच शैलीत राज्यपालांचा समाचार घेतला आहे.