जगातील असं ठिकाण जिथे वर्षातील 297 दिवस आकाशात चमकतात वीजा; रात्रीचं दृश्य पाहून व्हाल थक्क!

जगात एक असं ठिकाण आहे, जिथे वर्षातील तब्बल 297 दिवस वादळी वातावरण आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळतो. विशेष म्हणजे या विजा प्रामुख्याने रात्रीच्या वेळी चमकतात. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार नेमका कुठे घडतो आणि यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे? जाणून घेऊया.

जगातील असं ठिकाण जिथे वर्षातील 297 दिवस आकाशात चमकतात वीजा; रात्रीचं दृश्य पाहून व्हाल थक्क!
याठिकाणी वर्षातील 297 दिवस आकाशात चमकतात वीजा;
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2026 | 8:51 AM

जगात अनेक अशी ठिकाणं आहेत, जी त्यांच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतात. कुठे सूर्य कित्येक दिवस मावळत नाही, तर कुठे अनेक महिने सूर्यदर्शन होत नाही. मात्र, जगात असंही एक ठिकाण आहे, जिथे वर्षातील बहुतांश दिवस रात्रीच्या आकाशात विजांचा लखलखाट पाहायला मिळतो. विशेष म्हणजे वर्षातील सरासरी 297 दिवस या परिसरात वादळी ढगांची निर्मिती होते. हे ठिकाण म्हणजे दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशातील माराकायबो सरोवर (Lake Maracaibo). या नैसर्गिक घटनेला ‘कॅटाटुम्बो लाइटनिंग’ (Catatumbo Lightning) असं नाव देण्यात आलं आहे.

कुठे आहे हे अद्भुत सरोवर?

माराकायबो सरोवर हे व्हेनेझुएलाच्या वायव्य भागात असून दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठं सरोवर म्हणून ओळखलं जातं. या सरोवराच्या परिसरात अँडीज पर्वतरांगा, उष्ण पाण्याचा मोठा साठा आणि कॅरिबियन समुद्राकडून येणारे वारे यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. याच भौगोलिक रचनेमुळे इथं वारंवार वादळांची निर्मिती होते. विशेष म्हणजे या परिसरात रात्रीच्या वेळी विजांचा कडकडाट अधिक प्रमाणात होतो.

Loading...

पहा फोटो-

वर्षातील 297 दिवस का चमकतात वीजा?

अमेरिकन मेटेरॉलॉजिकल सोसायटीच्या संशोधनानुसार, माराकायबो सरोवराच्या परिसरात वर्षाला सरासरी 297 दिवस वादळी ढगांची निर्मिती होते. यामागे या प्रदेशातील विशिष्ट भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे. सरोवरातील पाणी वर्षभर उबदार असतं. त्याचं तापमान साधारण 28 ते 31 अंश सेल्सिअस असते. त्यामुळे पाण्यातून मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होतं. दुसरीकडे, अँडीज पर्वतरांगांमधून खाली येणारे थंड वारे आणि सरोवराकडून वर जाणारी उष्ण, दमट हवा एकमेकांना भिडतात. तसंच समुद्राकडून येणारे वारे आणि पर्वतीय वाऱ्यांचा परस्परांशी होणारा संयोग यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण होते. परिणामी आकाशात मोठ्या प्रमाणात वादळी ढग तयार होतात आणि विजांचा कडकडाट सुरू होतो.

रात्रीच्या अंधारात दिसतं अद्भुत दृश्य

या नैसर्गिक घटनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या वेळी दिसणारा विजांचा लखलखाट. विशेषतः मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत या परिसरात विजांची सक्रियता अधिक असते. संशोधनानुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास वीजा अधिक कडाडतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात इथं विजांची सक्रियता अधिक नोंदवली जाते. काही वादळी सत्रं अनेक तास सुरू राहू शकतात. त्यामुळे काळोख्या आकाशात सतत चमकणाऱ्या विजांमुळे संपूर्ण परिसर एखाद्या प्रकाशाच्या खेळासारखा दिसतो.

एकेकाळी खलाशांसाठी ठरायचं दिशादर्शक

माराकायबो सरोवरातील विजांचा हा लखलखाट केवळ वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर त्याला ऐतिहासिक संदर्भही आहे. पूर्वी कॅरिबियन समुद्रातून प्रवास करणारे खलाशी रात्रीच्या वेळी या विजांच्या प्रकाशाचा उपयोग दिशादर्शक म्हणून करत असत. त्यामुळे या घटनेला ‘लाइटहाऊस ऑफ कॅटाटुम्बो’ असंही म्हटलं जातं. आजही हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक रात्रीच्या वेळी बोटीतून प्रवास करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us