AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॅपिडो, ओला,उबर विरोधात महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी चालकांचा बंद; पण…नेमकं काय घडलं?

रॅपिडो विरोधात महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी चालकांनी बंद पुकारला आहे. त्यानंतरही अनेक रिक्षा रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे संपावरून संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.

रॅपिडो, ओला,उबर विरोधात महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी चालकांचा बंद; पण...नेमकं काय घडलं?
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 8:43 AM
Share

महाराष्ट्रात आज रिक्षा संपाची हाक देण्यात आली आहे. या संपामुळे मुंबईसह राज्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.  या आंदोलनामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरांमध्ये रिक्षा सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही रिक्षा रस्त्यावर देखील दिसत आहेत. त्यामुळे संपावरून रिक्षा चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.

पुण्यात राज्यमंत्री, विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयासमोर निदर्शने होणार 

रिक्षा संपाचे पडसाद मुंबई, पुण्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरातही रिक्षा संघटनांनी आंदोलनाचा नारा दिला आहे. पुणे शहरातील बाईक टॅक्सी धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आज रिक्षा संघटनांचं आंदोलन करणयात आलं.  आज सकाळी 11 वाजता परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे.  आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रिक्षा बंद राहणार असल्याची माहिती रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिली. पुणे शहरातील बाईक टॅक्सीला हद्दपार करण्याच्या मागणीसाठी रिक्षा पंचायत आणि मित्र संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकार बाईक टॅक्सीला पुन्हा नव्याने परवानगी देण्याच्या तयारीत असल्याने रिक्षा पंचायत संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. आंदोलनात पूर्णपणे परवानगी देणारे धोरण रद्द करावे ही प्रमुख मागणी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक रिक्षा संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहे.

संपाचा परिणाम कमी 

रॅपिडोच्या विरोधात ऑटो-टॅक्सी युनियनने आज संप पुकारलाय. मात्र, मुंबई उपनगरातील गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि मालाडमध्ये या संपाचा परिणाम दिसत नाहीये. सर्व ठिकाणी ऑटो रिक्षा, टॅक्सी सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे. बोरिवलीमध्येही ऑटो रिक्षा सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे. मुंबईत मनसे वाहतूक सेना आणि धडक कामगार युनियनसह अनेक संघटनांनी आजच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे, पण त्याचाही परिणाम दिसत नाहीये.

रिक्षा, टॅक्सी संपाचे प्रमुख कारण काय? 

रिक्षा, टॅक्सी चालकांकडून रॅपिडो आणि उबरच्या बाईक टॅक्सी सेवांना रिक्षा संघटनांचा तीव्र विरोध केला जात आहे. आवश्यक परवानग्यांशिवाय बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा संघटनांचा आरोप आहे.  बाईक टॅक्सीमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.  सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालकांवर आर्थिक भार वाढला आहे. रिक्षांच्या मीटर भाड्यात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे.  रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!