रेल्वेत मध्यभागीच का असते AC बोगी; सर्वसाधारण डब्बा का असतो एकदम सुरुवातीला अथवा मागच्या बाजूला?

एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सहाजिकच अधिक तिकीट दरामुळे सोयी सुविधा ही अधिक देणे आवश्यक आणि अपेक्षित असते. इतर बोगीतील प्रवाशांपेक्षा त्यांना जादा सुविधा पुरवाव्या लागतात.

रेल्वेत मध्यभागीच का असते AC बोगी; सर्वसाधारण डब्बा का असतो एकदम सुरुवातीला अथवा मागच्या बाजूला?
Train Coach
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 2:18 PM

मुंबई : राजधानी, शताब्दी एक्सप्रेस या पूर्णतः वातानुकूलित (Air Condion) आहेत. मात्र सर्वसामान्य आणि उच्च मध्यमवर्गीय एक्स्प्रेस अथवा मेल ट्रेनने प्रवास करतात. या एक्स्प्रेस ट्रेन मध्ये सर्वात अगोदर इंजिन, मग सर्वसाधारण ( General) डबा, नंतर स्लीपर, एसी बोगी आणि पुन्हा जनरल डबा जोडलेला असतो. तात्पर्य काय की, एसी आणि अपर क्लास डब्बे नेहमी ट्रेनच्या मध्यभागीच असतात. तर सर्वसाधारण डब्बे नेहमी अग्रभागी आणि शेवटी असतात. अशी व्यवस्था का असते? कधी विचार केलाय?

माहितीनुसार, रेल्वेत हा कोचचा क्रम सुविधा आणि सुरक्षा लक्षात घेऊन ठेवतात. त्यासाठी रेल्वेचं डिझाईन ठरते. अपर क्लास डबा, लेडिज कंपार्टमेंट हे रेल्वेच्या मध्यभागी असतात. तर सर्वाधिक गर्दी असलेले जनरल डबे हे अग्रभागी आणि सर्वात शेवटी असतात. तिकिट दरानुसार सोयीसुविधा पुरविल्या जातात.

गर्दीचे विभाजन होते!

वातानुकूलित वातावरण असलेल्या कोचचे भाडे अधिक असल्याने त्यांना इतर प्रवाशांच्या मानाने अधिक प्रमाणात सोयी सुविधा पुरविण्यात येतात. रेल्वेच्या सुरुवातीच्या आणि मागच्या डब्यात गर्दी असते. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची या डब्यात चढण्यासाठी चढाओढ लागते. दोन्ही डब्बे पुढे मागे असल्याने सहाजिकच गर्दी विभागली जाते. मधल्या डब्यात शिरणाऱ्यांचे प्रमाण कमी असते.

अधिकची सोय!

तुम्ही लक्षात घेतलं असेल तर रेल्वे स्थानकांवर बाहेर पडण्याचा मार्ग हा मध्यभागी असतो. रेल्वे स्थानकावर थांबते तेव्हा वातानुकूलित डबा बाहेर पडण्यासाठी असलेल्या दरवाजा पाशीच येऊन थांबतो. त्यामुळे एसी डब्यातील प्रवाशी इतर प्रवाशांच्या मानाने लवकर स्थानका बाहेर पडतात. तर जनरल डब्यातील लोकांची उतरण्यापासून ते बाहेर पडण्यापर्यंत एकच तौबा गर्दी उसळते.

मीडिया रिपोर्टनुसार, जनरल डब्यातील प्रवाशांच्या गर्दीपासून एसी डब्यात प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंचे संरक्षण करण्यासाठी डब्यांची अशी व्यवस्था करण्यात येते. जनरल डबे मध्यभागी ठेवल्यास बाहेरुन आलेली एकच गर्दी उसळेल आणि त्यामुळे चेंगराचेंगरी होऊ शकते. धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात दुर्घटना घडू शकते. हे टाळण्यासाठी एसी डबा मध्यभागी असतो.

हेही वाचा :

Video: कपाळात मोठे हिरवे चमकदार डोळे, पॅसिफिक समुद्रात अत्यंत दुर्मिळ माशाचं दर्शन, पाहा दुर्मिळ माशाचा व्हिडीओ

Earth Water Research | पृथ्वीवरील पाणी बर्फाळ धूमकेतू आणि अवकाशातील धुलिकणांतून? ब्रिटिश संशोधकांचा दावा

मी अजून करु शकलो असतो ही भावना घेऊन बेडवर जाऊ नका, जगण्याशी संघर्ष करणाऱ्या ग्रुप कॅप्टन वरुणसिंग यांचं पत्रं व्हायरल