Earth Water Research | पृथ्वीवरील पाणी बर्फाळ धूमकेतू आणि अवकाशातील धुलिकणांतून? ब्रिटिश संशोधकांचा दावा

समुद्रांची उत्पत्ती या जगाच्या बाहेर झाली होती, या कल्पनेला पाठबळ देणारे संशोधन ब्रिटीश शास्त्रज्ञांच्या गटाने केले आहे. जपानी रोबोने 25143 इटोकावा (Itokawa) नावाच्या लघुग्रहावरुन पृथ्वीवर आणलेल्या कणांचा अभ्यास या गटाने केला आहे.

Earth Water Research | पृथ्वीवरील पाणी बर्फाळ धूमकेतू आणि अवकाशातील धुलिकणांतून? ब्रिटिश संशोधकांचा दावा
फोटो : NASA
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 9:38 AM

मुंबई : बाह्य अवकाशातून पाहिल्यावर ग्रहाला निळा रंग देणारे पाणी पृथ्वीच्या (The Earth) पृष्ठभागाच्या तीन चतुर्थांश भाग व्यापते. परंतु युगानुयुगं जीवसृष्टीचे पोषण करणारा द्रव पाण्याचा स्त्रोत (Water) हा मुख्य वैज्ञानिक वादाचा विषय आहे. महासागरातील पाणी बर्फाळ धूमकेतू (Icy Comets) आणि अवकाशातील धुलिकणांतून तयार झाले, असा दावा नव्या संशोधनातून केला जात आहे.

पाण्याच्या उगमाबद्दल मतभिन्नता

काही संशोधकांचा युक्तिवाद आहे, की 4.5 अब्ज वर्षांपूर्वी धुळीचे ढग आणि वायूंचा संयुग झाल्यापासून पाणी जगात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अस्तित्वात आहे. मात्र काही शास्त्रज्ञांमध्ये याबाबत मतभिन्नता आहे. काही जणांच्या मते, पृथ्वी ही सुरुवातीच्या काळात कोरडी आणि निर्जल होती. परग्रहीय स्त्रोतांमधून बर्फ आणि पाण्याचा वर्षाव झाल्यावर मोठ्या कालावधीनंतर महासागर अस्तित्वात आले. यातून पृथ्वीला व्यापणारे 332,500,000 घन मैल पाणी तयार झाले, असा त्यांचा तर्क आहे.

बाह्य अवकाशातून महासागर निर्माण

समुद्रांची उत्पत्ती या जगाच्या बाहेर झाली होती, या कल्पनेला पाठबळ देणारे संशोधन ब्रिटीश शास्त्रज्ञांच्या गटाने केले आहे. जपानी रोबोने 25143 इटोकावा (Itokawa) नावाच्या लघुग्रहावरुन पृथ्वीवर आणलेल्या कणांचा अभ्यास या गटाने केला आहे. त्यानंतर बाह्य अवकाशातून महासागर निर्माण झाल्याच्या संकल्पनेचे समर्थन केले जात आहे.

ग्लासगो विद्यापीठाचे ल्यूक डेली म्हणाले, “आपले महासागर सूर्यमालेतील इतर भागांतून आलेल्या पाण्यापासून निर्माण झाले आहेत, याचे पुरावे आम्ही अभ्यास केलेल्या धुलिकणातून मिळाले आहेत. पृथ्वीवरील किमान अर्धे पाणी आंतरग्रहीय धूलिकणातून फिल्टर झाले असल्याचे हे सूचित करते”

लघुग्रहातून परत आणलेल्या कणांमध्ये पाणी

डेली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 25143 इटोकावा लघुग्रहावरुन परत आणलेल्या धुळीच्या कणांचा अभ्यास करण्यासाठी अणू-प्रोब टोमोग्राफी वापरली. या विलक्षण तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञांना नमुन्यातील अणू एक-एक करुन मोजता येतात. अशाप्रकारे, लघुग्रहातून परत आणलेल्या कणांमध्ये पाण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे उघड झाले, असे शास्त्रज्ञांनी नेचर अॅस्ट्रॉनॉमी (Nature Astronomy) जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.

हे पाणी बहुदा सूर्यापासून वाहणार्‍या कणांच्या प्रवाहामुळे म्हणजेच सौर वार्‍याने निर्माण केले असावे, असा डेली यांचा निष्कर्ष आहे. सूर्यमालेतील ढगांमध्ये तयार झाले हे कण सूर्यमालेतून तरंगणाऱ्या धुळीच्या ढगांमधील ऑक्सिजनच्या अणूंशी संपर्कात येऊन पाण्याचे रेणू तयार करतात, असंही डेली म्हणाले.

संबंधित बातम्या :

प्रतिकूल परस्थितीमध्ये जनावरांना ‘हे’ आहे पर्यायी खाद्य, योग्य नियोजनाद्वारे सकस आहार

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.