प्रतिकूल परस्थितीमध्ये जनावरांना ‘हे’ आहे पर्यायी खाद्य, योग्य नियोजनाद्वारे सकस आहार

प्रतिकूल परस्थितीमध्ये जनावरांना 'हे' आहे पर्यायी खाद्य, योग्य नियोजनाद्वारे सकस आहार
संग्रहीत छायाचित्र

ज्वारीचा कडबा, मक्याचा कडबा एवढेच चारा म्हणून शेतकऱ्यांना माहिती आहे. हिरवा चारा पावसाळा व हिवाळ्याच्या सुरवातीचा काळात साधारण शेतकरी वापरतो. परंतु येणाऱ्या उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन काय करायचे हा प्रश्न पडतो. जनावरांचे पोट भरण्यासाठी साधारणतः 50 ते 100 टक्के वाटा वैरणीचा असतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 12, 2021 | 7:30 AM

मुंबई : दुष्काळी परस्थितीमध्येच चाऱ्याची टंचाई भासते असे नाही तर अतिरीक्त पाऊस झाल्यावरही चाऱ्याची नासाडी होऊन टंचाई भासतेच. अशा वेळी पर्यायी (Fodder for animals) चारा हाच उपयोगी पडतो. शक्यतो ज्वारीचा कडबा, मक्याचा कडबा एवढेच चारा म्हणून शेतकऱ्यांना माहिती आहे. हिरवा चारा पावसाळा व हिवाळ्याच्या सुरवातीचा काळात साधारण (farmers) शेतकरी वापरतो. परंतु येणाऱ्या उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचे (proper planning) नियोजन काय करायचे हा प्रश्न पडतो. जनावरांचे पोट भरण्यासाठी साधारणतः 50 ते 100 टक्के वाटा वैरणीचा असतो. 400 ते 500 किलो वजनाच्या जनावरांना 1 ते 1.5 किलो आहार दररोज लागतोच.

कसा करावा जनावरांच्या आहारात बदल

आपल्या सोयीनुसार जनावरांच्या आहारात अचानक बदल करायचे नसतात. हे बदल हळूहळू व कमी प्रमाणात करावा. जुन्या खाद्यात नवीन खाद्ये मिसळून हा बदल 8 ते 12 दिवसात पूर्ण करायचा असतो. जितके जास्त खाद्य तेवढी जास्त ऊर्जा जनावरांना मिळते. यामुळे दुष्काळात वैरणीला पर्याय असणे आवश्यक असते. वैरणीला पर्याय कोणता चारा उपयोगी पडणार आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत

ऊसाचा चोथा

साखर कारखान्यातून उरलेला ऊसाचा चोथा रासायनिक प्रक्रियेद्वारा दुष्काळात पर्यायी खादय म्हणून वापरता येतो. रासायनिक प्रक्रिया करताना ऊसाच्या चोथ्यावर 4% कॉस्टीक सोड्याची प्रक्रिया करून जनावरांसाठी चारा म्हणून वापरता येतो. वैरणीत 40 ते 60% ओलावा असेल अशा बेताने 4 ते 6% प्रमाणात युरीया पाण्यात मिसळून हे द्रावण वैरणीवर किंवा ऊसाच्या चोथ्यावर फवारावे व ते खड्ड्यात भरावे. नंतर ख[ड्डा हवा बंद करून 3 आठवडे तसाच ठेवावा. या काळात युरियाचे विघटन होते व अमोनिया वेगळा होऊन वैरणीत मुरतो. अशी प्रकिया भाताचा पेंडा, गव्हाचे कांड, केळींची खुंटे व पाने, जंगली गवतांवर सुद्धा करता येते .

शेंगाची आणि भाताची टरफले

शेंगदाण्याचे तेल काढल्यानंतर राहिलेली टरफले जर 5% मळी सोबत मिसळून बारीक करुन खादय म्हणून वापर केला तर पचनीय प्रथिनांची गरज भागवता येते. भात भरडून त्याच्या टरफलामध्ये ७०% ओलावा व ६०% युरिया मिसळून ते 2 महिने मुरु द्यावे. ही मुरलेली टरफले वैरणीच्या 50% प्रमाणात वापरली तर जनावरांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो .

आंब्याच्या कोयीतील गर

आंब्याची झाडे सर्वत्र आढळतात. विशिष्ठ मौसमात आंबे भरपूर मिळतात . आंबे खाल्यानंतर कोयीवरचे कठीण टरफल काढून आतील गर जर जनावरांना खावू घातला तर ऊर्जा व प्रथिन्यांचीही गरज भागवता येते .

कोंबड्यांचे खत व गादी खत

पिंजऱ्यात पाळलेल्या कोंबड्यांचे मलमुत्र, गादीसाठी वापरलेल्या वस्तूत मिसळून जनावरांच्या आहारात उपयोग करता येतो. कोंबड्यांच्या खतात 30% पर्यंत अशुद्ध प्रथीने असते व त्यातील अर्धे नत्र युरीक आम्लाच्या रुपात आढळते. जनावरे अशुद्ध प्रथिनांपैकी 80% पर्यंत भाग पचवू शकतो. खतात व गादी खतात खनिजेही पुरेशी असतात असे व गादी खत वाळवून जनावांना खावू घालावे . परंतु हे खत लहान जनावरांना खावू घालू नये.

संबंधित बातम्या :

रब्बी हंगामात मुख्य पिकांमध्येच होतोय बदल, शेतकऱ्यांचा कशावर आहे भर ?

Rabbi Season : महिन्याभराने लांबला रब्बीचा पेरा, काय होणार उत्पादनावर परिणाम ?

तीन दिवसाच्या घसरणीनंतर काय आहेत सोयाबीनचे दर ? नव्या तुरीचीही बाजारात आवक सुरु

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें