5

Rabbi Season : महिन्याभराने लांबला रब्बीचा पेरा, काय होणार उत्पादनावर परिणाम ?

नाही म्हणलं तरी, सततच्या पावसामुळे केवळ फळबागा आणि खरीपातील पिकांवरच परिणाम झाला नाही तर रब्बी हंगामातील पेरण्याही तब्बल महिन्याने लांबलेल्या आहेत. मराठवाड्यात सध्या सरासरीच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर आहे तर सर्वात कमी पेरा औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये झालेला आहे.

Rabbi Season : महिन्याभराने लांबला रब्बीचा पेरा, काय होणार उत्पादनावर परिणाम ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 4:36 PM

लातूर : नाही म्हणलं तरी, सततच्या पावसामुळे केवळ फळबागा आणि खरीपातील पिकांवरच परिणाम झाला नाही तर (Rabi Season) रब्बी हंगामातील पेरण्याही तब्बल महिन्याने लांबलेल्या आहेत. मराठवाड्यात सध्या सरासरीच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे. यामध्ये (Nanded) नांदेड जिल्हा आघाडीवर आहे तर सर्वात कमी पेरा औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. यामध्ये गहू वगळता इतर सर्वच पिकंच्या पेरणीला तसा उशिरच झालेला आहे. त्यामुळे (Farmers) शेतकऱ्यांच्या मनात उत्पादनाबद्दल आता शंका उपस्थित होत आहे. मात्र, याचा परिणाम उत्पादनावर होणार नाही तर योग्य ती काळजी घेतल्यास उलट उत्पादनात वाढ होणार असल्याचे कृषी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले आहे.  , , ,

पेरणीमध्येही नांदेड जिल्हा आघाडीवर

आतापर्यंत वेगवेगळ्या उपक्रमात नांदेड जिल्हा हा आघाडीवर राहिलेलान आहे. त्यामध्ये ई-पीक-पाहणी उपक्रम असेल किंवा पीक विमा रकमेच्या परतावा असेल. आता रब्बी हंगामातही मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातच अधिकचा पेरा झाला आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद व लातूर कृषी विभागांतील आठ जिल्ह्यांत 16 लाख 91 हजार 140 हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात 17 लाख 14 हजार 4 हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. अर्थात, संपूर्ण मराठवाड्याचा विचार करता पेरणी सरासरीपेक्षा अधिक झाली आहे. परंतु प्रत्यक्षात आठपैकी चार जिल्ह्यांत अजूनही अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. यामध्ये 1 लाख 40 हजार 223 हेक्टरावर नांदेड जिल्ह्यात पेरा झाला आहे.

हरभरा पिकावरच अधिकचा भर

रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पीक होते पण बदलते वातावरण आणि उत्पादनाचा विचार करता पिकपध्दतीमध्ये बदल होत आहे. यातच यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या अवाहनानुसार हरभऱ्याचाच अधिक पेरा झाला आहे. तर ज्वारीच्या क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली आहे. हरभरा पाठोपाठ गव्हाचा पेरा झाला असून अजून काही दिवस गव्हाची पेरणी ही सुरुच राहणार आहे. रब्बी हंगमात यंदा नव्याने राजमा पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे.

हरभऱ्याची उगवण होताच अळीचा प्रादुर्भाव

वातावरणातील बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकावरही जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे घाटाअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन केले तरच पीक जोमात वाढणार आहे. घाटेअळीचा प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रतिहेक्‍टर एच. एन. टी 250 रोगग्रस्त यांचा अर्थ फवारा वा याकरिता अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम राणी पण टाकून हे द्रावण एक मिलि प्रति लिटर प्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी हे फवारणी पिक शेतात प्रथम आणि द्वीतीय अवस्थेत असताना केल्यास अतिशय प्रभावी होते. त्यामुळे वेळेत आळीचा बंदोबस्त होतो तर पिकाच्या वाढीतील अडथळाही दूर होतो.

संबंधित बातम्या :

तीन दिवसाच्या घसरणीनंतर काय आहेत सोयाबीनचे दर ? नव्या तुरीचीही बाजारात आवक सुरु

अतिवृष्टीत जोपासली पण अवकाळीनंतर बुडापासूनच वाळले तुरीचे पीक, कसे करावे व्यवस्थापन?

Sugar Factories : शेवटी ऊसतोड मजुरच आले कामी, पावसाने यंत्रांची चाके रुतलेलीच

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल