मालमत्तेची नोंदणी करताना या पद्धतींचा करा अवलंब, लाखो रुपयांची होईल बचत
Property Registration: मालमत्तेची नोंदणी करताना जर तुम्ही खालील पद्धतींचा अवलंब केला तर नक्कीच तुमची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. घर खरेदी करताना अनेक जणांनी याची पूर्ण माहिती नसते. नवीन घर किंवा जागा खरेदी करण्यापूर्वी रजिस्ट्रेशनची पूर्ण माहिती करुन घ्या. ज्यामुळे तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.
मुंबई : आपल्यापैकी बहुतेक जण घर किंवा जमीन खरेदी लोन घेतात. काही जण बचत करुन रक्कम जमा करतात मग घर घेतात. मात्र, घर किंवा जमीन खरेदी केल्यानंतर त्यावर मालकी हक्क मिळवण्यासाठी नोंदणी करून घ्यावी लागते. नोंदणी केल्यानंतरच त्या घरावर किंवा जमिनीवर तुमचा मालकी हक्क असतो. घर किंवा प्लॉट खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक राज्यात नोंदणी प्रक्रिया वेगळी असते. अनेक राज्यांमध्ये नोंदणी शुल्क 5 ते 7 टक्क्यांपर्यंत आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास पद्धतींबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जमिनीची किंवा घराची नोंदणी करताना तुमचे पैसे वाचवू शकता.
मालमत्तेच्या नोंदणीवर पैसे कसे वाचवायचे
अनेक राज्ये एखाद्या महिलेच्या नावाने घर खरेदी नोंदणी करत असेल तर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कात सूट देतात. दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही काही राज्ये आहेत जी महिलांच्या नावावर नोंदणीमध्ये सूट देतात.
अनेकदा मालमत्तेची किंमत. तो निश्चित सर्कर रेट पेक्षा जास्त असते. त्यामुळे नोंदणीच्या वेळी मुद्रांक शुल्क अधिक आकारले जाते. तर सर्कल रेटवर मुद्रांक शुल्क कमी आहे.
Home Loan : होमलोन संपल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्रे मागायला विसरु नका
अशा परिस्थितीत नोंदणीच्या वेळी निबंधक किंवा उपनिबंधक यांच्याकडे दाद मागून तुम्ही मुद्रांक शुल्कावरील जास्त खर्च वाचवू शकता. तुम्हीही तुमच्या जमिनीची नोंदणी करून घेणार असाल तर या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता.