AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही – संजय राऊत

बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कधीच विसरू शकत नाही. माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या या विधानाचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. मोदींचं बाळासाहेबांबद्दल असलेलं प्रेम खोटं आहे, त्यांचे नक्राश्रू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही - संजय राऊत
sanjay raut
| Updated on: May 03, 2024 | 2:17 PM
Share

बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कधीच विसरू शकत नाही. माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी हे भावूक झाले होते. मात्र त्यांच्या या विधानावरून शिवसेना ठाकरे गट संतापला असून मोदींचं बाळासाहेबांबद्दल असलेलं प्रेम खोटं आहे, त्यांचे नक्राश्रू आहेत, अशी टीका करत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही, आम्ही समोर उभ राहणार असे म्हणत त्यांनी शिवसेना -भाजपचे पुन्हा मनोमिलन होण्याच्या शक्यता फेटाळल्या.

मोदींचं प्रेम खोटं

नरेंद्र मोदींनी यांनीच महाराष्ट्रात आणि शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या.  मोदी यांचा बाळासाहेबांवर एवढं प्रेम असतं तर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना अशा प्रकारे फोडली नसती. नुसती तोडली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नावं एका बेईमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं, त्यांचा धनुष्यबाण हे चिन्ह एका बेईमान व्यक्तीच्या हातावर ठेवलं नसतं, अशी टीका राऊत यांनी केली. मोदींचं उफाळून आलेलं प्रेम खोटं आहे ते नकाश्रू  आहेत असं ते म्हणाले.

आम्ही त्या दरवाजासमोर उभं राहणार नाही

उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर त्यांना मदत करणारी पहिली व्यक्ती मीच असेन, असं वक्तव्यही मोदी यांनी केलं. ते  उद्धव ठाकरेंसमोर एक खिडकी उघडत आहेत का, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. त्यावरही राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिलं.  खिडकी काय, मोदींनी  दरवाजे उघडले तरी काहीच फरक पडत नाहीत, आम्ही त्यासमोर उभं राहणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात अजून शिल्लक आहे, असेही ते म्हणाले.

ते जर असं वागत असतील तर याचा अर्थ एकच की मोदींना बहुमत मिळत नाहीये, त्यांचा पराभव होतोय हे दिसंतय म्हणून ते अशा फटी, दरवाजे  शोधत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला. मोदी, शहा, अडचणीत आहेत, त्यामुळे असे बोलत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.

ठाकरेंविरोधात बोलणार नाही

बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे, असं कारण पंतप्रधानांनी दिलं. त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन, असं मोदी म्हणाले. टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतीत पंतप्रधानांनी ही भूमिका जाहीर केली.

Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा