
अजरबैजान येथील विमान अपघाताचे फोटो व्हायरल झाले आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. हे होत नाही तोच दक्षिण कोरियातील विमान अपघाताची बातमी येऊन धडकली. थायलंडहून दक्षिण कोरियासाठी विमानाने उड्डाण घेणार होतं. सकाळीच रनवेवरून उड्डाण घेण्यापूर्वी हे विमान क्रॅश झालं. त्यामुळे विमानात आग लागली. या आगीत 120 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अजरबैजान येथील विमान अपघातात 38 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांवर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या दोन्ही विमान दुर्घटना पाहिल्या तर एका छोट्या चुकीमुळे किती तरी लोकांचा जीव जाऊ शकतो हे स्पष्ट झालंय. पण मग मात्र, प्रश्न हा निर्माण होतो की, चूक कोणाची? पायलटचा आहे की काही त्यामागे तांत्रिक कारण आहे. एवढं आधुनिक तंत्रज्ञान असताना विमान दुर्घटना कशी होते? असा सवालही निर्माण होतो. ही सर्व कारणं जाणून घेण्यासाठी आपल्याला टेक ऑफ पासून लँडिंगपर्यंत विमानाचं काम कसं चालतं याची...