हॉस्पिटलने केले होते तब्बल १.७३ कोटीचे बिल, AI चॅटबॉट केला असा चमत्कार की प्रशासन गुडघ्यावर आले…

खाजगी पंचतारांकित हॉस्पिटलची भरमसाट बिले भरताना सामान्य लोकांचे आयुष्य उद्धवस्त होत असते. परंतू एका तरुणाने एआय चॅटबोटचा वापर करत या बिलातील छुपी दरवाढ शोधून त्यांचे पितळ उघड केल्याचे प्रकरण घडले आहे.

हॉस्पिटलने केले होते तब्बल १.७३ कोटीचे बिल, AI चॅटबॉट केला असा चमत्कार की प्रशासन गुडघ्यावर आले...
| Updated on: Nov 05, 2025 | 7:17 PM

अमेरिकेतील एक कुटुंब त्यांच्या प्रिय व्यकीच्या मृत्यूने शोक सागरात बुडाले होते. त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. परंतू प्रियव्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर आणखी एक संकट कोसळले, कारण या रुग्णालयाने चार तासांच्या उपचाराचे बिल १.७३ कोटी (१९५,००० डॉलर ) रुपये सांगितले. त्यांची अडचण ही होती की इंश्योरन्स पॉलिसी दोन महिन्यांपूर्वीच लॅप्स झाली होती. अशाच हे बिल भरणे कुटुंबासाठी अशक्य होते. परंतू त्यांनी हार मानली नाही आणि लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या अवाच्या सवा बिलाचा भंडाफोड करण्यासाठी एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चॅटबॉटला आपले हत्यार म्हणून वापरले.

AI चॅटबॉटने बिलाचा बारकाईने अभ्यास केला

हे तगड्या बिलाचे आव्हान मृत रुग्णाच्याय मेहुण्याने ( यूजरनेम @nthmonkey )  सांभाळले. त्यांनी या आर्थिक जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी टेक्नॉलॉजीचा आधार घेतला आणि ‘क्लॉड’ ( Claude ) नावाच्या एका AI चॅटबॉटची मदत घेतली. अमेरिकेतील हॉस्पिटलची बिले नेहमीच मेडीकलचे शब्द आणि गुप्त कोड किचकट भरलेली असतात. त्यांनी समजणे सामान्याचे काम नाही. ज्यावेळी कुटुंबाने रुग्णालयाकडे आयटम वाईज बिल मागितले. तेव्हा त्यांना ‘कॉर्डिओलॉजी – ७०,००० डॉलर’ सारखी गोलमोल माहिती मिळाली. त्यामुळे कोणत्या बाबीचे किती बिल लावले हे कळणे कठीण होते.

AI ने पकडली 1 लाख डॉलरची ‘डबल बिलींग’

येथेच AI ने आपले खरे कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली. @nthmonkey यांनी बिलाचे संपूर्ण ब्रेकडाऊन आणि CPT कोड्स AI ला तपासण्यास दिले. तेव्हा AIचे निष्कर्ष धक्कादायक होते. चॅटबोटने तातडीने त्या चुका पकडल्या. ज्या पकडणे माणसांना शक्य नव्हते. AI ने आढळले की बिलात एक असा कोड जोडला होता, ज्याच्या नंतर उपचारासाठी वापरलेल्या अन्य प्रक्रीया आणि सप्लाईजेचे बिल बनवता येणे कठीण होते.

हॉस्पिटलने एक ‘मास्टर प्रोसीजर’ आणि त्यानंतर त्याचे प्रत्येक छोटे घटकाचा बिल वेग-वेगळे जोडले होते. एका याच चुकीमुळे बिलात सुमारे १००,००० डॉलर ( सुमारे ८८ लाख रुपये ) फालतूचे जोडले गेले होते. याशिवाय AI ने इनपेशेंट आणि इमर्जन्सी कोडच्या चुकीचा वापर आणि वेंटिलेटर बिलींगशी संबंधीत गडबडीलाही पकडले.

अखेर बिल घटवण्यास तयार झाले

जेव्हा कुटुंबाने या पुराव्यांसह रुग्णालयाला जाब विचारला. तेव्हा हॉस्पिटलने त्यांनी ‘चॅरिटी ऐड’ (दान सहायता) साठी अर्ज करण्याचा सल्ला दिला.परंतू कुटुंब त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिले.@nthmonkey यांनी स्पष्ट केले आणि खैरात मागत नसून बिलातील गडबड उघड करत आहोत. त्यांनी एका अन्य एआय असिस्टन्टच्या मदतीने एक औपचारिक पत्र ही तयार केले. या पत्रात एआयने शोधलेल्या सर्व बिलींगच्या चुका, मेडिकेअर नियमांचे उल्लंघनाचा उल्लेख केला. आणि कायदेशीर कारवाई आणि सोशल मीडियावर यास व्हायरल करण्याचा इशारा दिला.

याचा ताबडतोब परिणाम झाला. हॉस्पिटल प्रशासन त्यांची चुक कबूल करण्यास तयार झाले. आणि १९५,००० ( १.७३ कोटी ) च्या बिलाला घटवून त्यांनी ३३,००० डॉलर ( सुमारे २९ लाख रुपये ) केले. काही आणखी चर्चा केल्यानंतर कुटुंब या घटलेल्या रकमेचे बिल चुकते करण्यास सहमत झाले. @nthmonkey यांनी सांगितले की AI सब्सक्रिप्शनसाठी ते महिन्याला २० डॉलर ( सुमारे १८०० रुपये ) भरतात. त्यांनी त्यांचे सवा कोटी रुपये वाचवले.