
डिजिटल युगात, रोख रकमेपेक्षा कार्ड अधिक महत्त्वाचे झाले आहेत. खरेदीपासून ते बिल पेमेंटपर्यंत, सर्व काही डेबिट आणि क्रेडिट कार्डने केले जाते… पण, हे विसरू नका की तुमचे सर्व कष्टाचे पैसे चार अंकी ‘पिन’ क्रमांकाच्या मागे लपलेले असतात. बरेच लोक सर्वात सामान्य क्रमांक पिन म्हणून निवडतात कारण ते लक्षात ठेवणे सोपे असते. पण, तज्ज्ञ चेतावणी देतात की सायबर गुन्हेगार काही सेकंदात असे क्रमांक शोधू शकतात. तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणते क्रमांक टाळावेत? याबद्दल देखील तज्ज्ञांनी मोठी माहिती दिली आहे.
सायबर गुन्हे दररोज नवीन मार्गांनी घडत आहेत. हॅकर्स आता लोकांच्या मानसशास्त्राचा अंदाज घेत पिन नंबर हॅक करत आहेत. तुम्ही वापरत असलेला पिन नंबर तुमची जन्मतारीख आहे का? की तुमच्या फोन नंबरचे शेवटचे अंक? पण तुम्ही धोक्याच्या क्षेत्रात आहात. आता जाणून घेऊया कोणते पिन नंबर सर्वात धोकादायक आहेत आणि तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणते बदल करू शकता.
क्रम क्रमांक: 1234, 4321, 5678 असे क्रमांक हॅकर्स वापरतात… तर 1111, 2222, 3333, 0000, 5555 .यांसारखे अंक कधीही वापरू नका. हे सर्वात कमकुवत पिन क्रमांक आहेत. तुमच्या वाढदिवसाची तारीख आणि मोबाईलचा शेवटचा क्रमांक कधीच पिन म्हणून ठेवू नका… हॅकर्स तुमच्या सोशल मीडिया किंवा कागदपत्रांद्वारे हे तपशील सहजपणे शोधू शकतात.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल नंबर, वाहन क्रमांक किंवा आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक पिन म्हणून वापरणे असुरक्षित आहे. तुमच्या आवडत्या तारखांव्यतिरिक्त, 4892, 3927 यांसारखे क्रमांक निवडा जे कोणीही अंदाज लावू शकणार नाहीत.
जर तुमच्याकडे दोन किंवा तीन कार्ड असतील, तर तुमच्याकडे सर्वांसाठी एकच पिन नसावा. प्रत्येक कार्डचा एक वेगळा पिन असावा. तुमचा पिन किमान दर 6 ते 12 महिन्यांनी बदलणे चांगले. अनेकदा फेक कॉल येतात आणि तुम्हाला तुमच्या खात्याबद्दल विचारतात अशा लोकांना बिलकून माहिती सांगू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फोनवर किंवा कार्डच्या मागील बाजूस पिन क्रमांक लिहून ठेवणे खूप धोकादायक आहे. त्यामुळे डिजिटव व्यवहार करतामा सावध राहा…