AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Temperature Today : राज्यावर मोठं संकट, पुढील काही तास धोक्याची, थेट..

Maharashtra Temperature Today 2th May 2026 : भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार आहे. राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळतंय.

Maharashtra Temperature Today : राज्यावर मोठं संकट, पुढील काही तास धोक्याची, थेट..
Heat warning
| Updated on: May 02, 2026 | 7:20 AM
Share

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच उष्णता कमालीची वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात आजही उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज उन्हाच्या झळा अधिक तीव्र असतील. त्यामध्येच काही भागात पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यासोबतच मे महिन्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. 5 मे पर्यंत मुंबईत उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. आज उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे. या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना काही सूचना जारी करण्यात आल्यात. अतिमहत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच.

गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. मागील दोन दिवस तापमान 43 ते 44 अंशांवर होते, तर सध्या ते 42 अंशांवर आले आहे… ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

कधी उष्णता तर कधी पाऊस यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांच्या कोचिंग क्लासेसच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून उष्णघाताच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. काही भागात कडाक्याचे उन्ह तर काही भागात पाऊस अशी स्थिती राज्यात आहे. झारखंडसह अन्य राज्यात पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सततचा पाऊस तसेच त्यानंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याने यंदा तब्बल 70 टक्क्यांपर्यंत द्राक्षांचे उत्पादन घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचा आर्थिक कणा अक्षरशः मोडला असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा युरोप व नॉन-युरोप देशांमध्ये सुमारे 35 टक्क्यांनी द्राक्ष निर्यात घटली आहे तर बांगलादेश आणि नेपाळ या प्रमुख बाजारपेठांमध्ये 70 ते 80 टक्क्यांपर्यंत निर्यात घट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी