AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Police Khaki Vardi : निवृत्तीनंतर खाकी वर्दी वाढवू शकते पोलिसांचं टेन्शन, ड्रेसबाबत एक चुक करताच…

पोलिसाने एकदा खाकी वर्दी अंगावर चढवली की तो सेवेसाठी बांधील असतो. ही वर्दी म्हणजे कर्तव्य, अभिमानाचे प्रतीक असते. निवृत्तीनंतर हीच वर्दी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला परिधान करता येते का? असे विचारले जाते.

Police Khaki Vardi : निवृत्तीनंतर खाकी वर्दी वाढवू शकते पोलिसांचं टेन्शन, ड्रेसबाबत एक चुक करताच...
police khaki vardi (फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Nov 11, 2025 | 5:50 PM
Share

Police Dress : पोलीस दलात काम करणाऱ्यांसाठी त्यांच्या अंगावरची वर्दी फक्त एक साधारण ड्रेस नसतो. हा ड्रेस म्हणजे एक जबाबदारी, कर्तव्य, अभिमानाची भावना असते. पोलिसाची वर्दी अंगावर घातली की पोलीस कर्मचाऱ्यांना अभिमान वाटतो. सोबतच ही वर्दी जोपर्यंत अंगावर असते तोपर्यंत शेवटपर्यंत संबंधित व्यक्ती कर्तव्यास बांधील असते. परंतु निवृत्तीनंतरही हीच खाकी वर्दी पुन्हा परिधान करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे खाकी वर्दी अंगावर चढवण्याचे नेमके नियम काय आहेत? कोणत्या परिस्थितीत निवृत्तीनंतरही ही वर्दी पुन्हा परिधान करता येते? हे जाणून घेऊ या…

निवृत्तीनंतर पुन्हा पोलिसांची वर्दी परिधान करता येते का?

खरं म्हणजे निवृत्तीचा प्रसंग हा पोलिसांसाठी फार भवनिक क्षण असतो. खाकी वर्दी घालून आयुष्यभर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. निवृत्तीनंतर मात्र आता ते काम करता येत नाही. पोलिसांची सेवा समाप्त होते. निवृत्तीनंतर पोलीस कर्मचाऱ्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे जगावे लागते. कारण एकदा निवृत्त झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांची खाकी वर्दी परिधान करता येत नाही.

खाकी वर्दी पुन्हा का परिधान करता येत नाही?

निवृत्तीनंतर पोलीस कर्मचाऱ्यांना खाकी वर्दी परिधान करता येत नाही. कारण पोलिसांची खाकी वर्दी हे एक सेवेचे प्रतिक आहे. म्हणजेच जी व्यक्ती ही वर्दी परिधान करते ती पोलीस सेवेत सक्रीय असल्याचे समजले जाते. पोलीस अधिनियम 1861 कायदा तसेच या कायद्यात वेळोवेळी केलेल्या बदलानुसार सेवेत सक्रीय असलेली व्यक्तीच पोलिसांची वर्दी परिधान करू शकते. निवृत्तीनंतर कोणत्याही कर्मचाऱ्याने खाकी वर्दी परिधान केली तर ते कायद्याचे उल्लंघन समजले जाते.

कोणत्या परिस्थितीत खाकी वर्दी परिधान करता येते?

निवृत्तीनंतर खाकी वर्दी परिधान करण्यास परवानगी नसली तरीही काही विशेष प्रसंगाला ती परिधान करता येते. एखादा औपचारिक कार्यक्रम असेल, पोलीस स्मृती दिवस असेल, राज्यस्तरीय कार्यक्रम, सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम असेल तर संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांची वर्दी परिधान करता येते. मात्र त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. सेवानिवृत्त पोलीस त्यांना मिळालेली पदकं, चिन्ह, रँक सामान्य कपड्यांवर लावू शकतात. परंतु त्यांना पोलिसांची पूर्ण वर्दी परिधान करण्याची परवानगी नसते.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....