
भारतात वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागतो. अशातच आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता कालावधी 20 वर्षे किंवा चालकाच्या वयाच्या 50 वर्षांपर्यंत देतात. पण अशातच जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची शेवटची तारीख असेल तर एक्सपायर होण्याआधी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईनरित्या लायसन्स रिन्यू करू शकतात. चला तर मग आजच्या या लेखात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन रिन्यू कसे करू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात…
ड्रायव्हिंग लायसन्स कधीपर्यंत ऑनलाइन रिन्यू करू शकतो?
ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपण्यापूर्वी किंवा नंतर रिन्यू करता येते. यासाठी, चालकाला एक वर्षाचा वाढीव कालावधी मिळतो आणि त्यानंतर तुमच्या गाडीचा एक्सपायर परवाना कायमचा रद्द केला जातो. तर ऑनलाईन पद्धतीने नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढता येते.
तर तुम्ही घरबसल्या तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स कसा रिन्यू करू शकता ते जाणून घेऊ. अशातच तुम्हाला वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (RTO) भेट द्यावी लागणार नाही.
ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे रिन्यू करायचे?
स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइट https://parivahan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
स्टेप 2: वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला ऑनलाइन सेवांवर क्लिक करावे लागेल आणि नंतर ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवांवर क्लिक करा.
स्टेप 3: आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव निवडावे लागेल.
स्टेप 4: राज्य निवडल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर अनेक पर्याय असतील आणि तुम्हाला “अॅप्लाई फॉर डीएल रिन्यूअल” पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 5: यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल ज्यामध्ये अर्ज सबमिट करण्याच्या सूचना दर्शविल्या जातील.
स्टेप 6: येथे तुम्हाला अर्ज किंवा तपशील काळजीपूर्वक भरावा लागेल.
स्टेप 7: त्यानंतर तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करावी लागतील.
स्टेप 8: याशिवाय तुम्हाला फक्त फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यास सांगितले जाऊ शकते.
पायरी 9: वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
स्टेप 10: यानंतर नवीन ड्रायव्हिंग लायसन्स पोस्टाद्वारे तुमच्या पत्त्यावर पोहोचवले जाईल.