रेल्वेसह विमान प्रवासात हे फळ नेण्यास बंदी, काय कारण तरी?

Railway Plane Travel: रेल्वे आणि विमान प्रवास करताना सुरक्षेसाठी प्रवाशांनाअनेक नियमांचे पलान करावे लागते. जसं विमानात, रेल्वे, बस प्रवासात ज्वलनशील पदार्थ नेता येत नाही. पण एखादं फळ नेता येत नाही, हे तुम्ही कधी ऐकलं आहे का?

रेल्वेसह विमान प्रवासात हे फळ नेण्यास बंदी, काय कारण तरी?
रेल्वेसह विमान प्रवासात हे फळ नेण्यास बंदी, काय कारण तरी?
| Updated on: Nov 11, 2026 | 1:44 PM

Railway Plane Travel: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आणि विमान प्रवासात सुरक्षेचे कडक नियम पाळावे लागतात. जसं विमानात, रेल्वे अथवा बस प्रवासात प्रवाशांना ज्वलनशील पदार्थ घेऊन जाता येत नाही. असा प्रवाशी आढळला तर त्याच्याविरोधात केळव दंडात्मकच नाही तर इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घातला म्हणून कायदेशीर कठोर कारवाई होऊ शकते. स्फोटके, फटाके, ॲसिड आणि ज्वलनशील रसायन यासारख्या धोकादायक वस्तू प्रवासात सोबत घेऊन जाता येत नाहीत. पण एखादं फळ नेता येत नाही, हे तुम्ही कधी ऐकलं आहे का? कोणतं फळ तुम्हाला या प्रवासादरम्यान नेता येत नाही? त्यामागे काय आहे कारण?

हे फळ नाही नेता येत सोबत

Loading...

काही दाव्यानुसार, सुके खोबरे, वाळलेले नारळ विमान आणि रेल्वे प्रवासात धोक्याचे मानले जाते. कारण यामध्ये तेलाचे प्रमाण असते. त्याच्या बाहेरील भागाला सहज आग लागण्याची शक्यता असते. यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून अनेकदा सुकलेले नारळ, संबंध खोबरे नेण्यात मज्जाव करण्यात येतो. कारण हे फळ त्यावेळी ज्वलनशील पदार्थांच्या श्रेणीत येते. सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य आगीचा धोका लक्षात घेत प्रवाशाला हा पदार्थ नेण्यास मज्जाव करण्यात येतो.

रेल्वे आणि विमान प्रवासातील महत्त्वाचा नियम

रेल्वे नियमानुसार, गॅस सिलेंडर, आगपेटी, लायटर, ग्रीस, तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे हा गुन्हा मानल्या जातो. त्याचप्रमाणे विमान प्रवासातही सुरक्षेची मानकं अत्यंत कडक असतात. सुक्या खोबऱ्यासारख्या वस्तूंमुळे विमानात अथवा ट्रेनमध्ये आग लागण्याची शक्यता असते. आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे सुरक्षा तपासणीत अनेकदा हे फळ बाजूला काढण्यास सांगितले जाते.

20 किलोंपेक्षा अधिक तूप नेल्यास कारवाई

तूप हे दिसायला साधं वाटतं. पण ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ तसेही आणू देत नाहीत. कारण यामुळे जोखिम निर्माण होऊ शकते. जर तूप सांडले तर त्यावर प्रवासी घसरून पडू शकतात. तर तूप हे ज्वलनशील असल्याने आगीचा धोकाही असतो. त्यामुळे पॅकिंगविषयी नियम कडक आहेत. जर 20 किलोंपेक्षा अधिक तूप नेल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे रेल्वेत अशा वस्तू नेण्याअगोदर नियम जाणून घेणे फायदेशीर ठरेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us