
आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. भारतात असे अनेक शहरं आहेत ज्यांची नावे आणि इतिहास अनोखा आहे. सध्या भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची खासियत आहे. भारतातील अनेक शहरांना फक्त त्यांच्या नावामुळे खास ओळख मिळाली आहे. भारतातील असंच एक शहर ज्याचं नाव फारच इंट्रेस्टींग आहे. भारतात असं फक्त एकच शहर असं आहे, ज्याचे नाव उलटे लिहा किंवा सरळ तरीही ते बदलत नाही. तुम्हाला माहित आहे का हे कोणते शहर आहे ते? चला जाणून घेऊयात.
भारतात किती शहरे आहेत?
भारतातील शहरांची संख्या जनगणनेनुसार बदलत राहते. जर आपण 2011 च्या जनगणनेवर नजर टाकली तर ही संख्या सुमारे 7,9,33 होती. त्याच वेळी, भारतात 300 हून अधिक शहरे अशी आहेत ज्यांची लोकसंख्या 1 लाखांपेक्षा जास्त आहे.
भारतीतील एकमेव शहर ज्याचे नाव बदलत नाही
या शहराबद्दल आपण सर्वांनीच ऐकलं असेल. पण नावाबद्दलची ही गोष्ट कदाचितच कोणाच्या लक्षात आली असेल. तर ज्या शहराचं नाव उलटे लिहा किंवा सरळ तरही याचं नाव बदलत नाही ते शहर आहे ओडिशा राज्यातील कटक. आता या शहराचं नाव जर का आपण पाहिलं तर ते सरळ लिहा किंवा शेवट्या अक्षरापासून लिहा, त्यात काहीच फरक जाणवत नाही. म्हणजेच ते नाव बदलत नाही.
शहराचा इतिहास काय आहे?
आता कटकच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. या शहराचा इतिहास सुमारे 1 हजार वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. केसरी राजवंशातील राजा केसरी यांनी 989 मध्ये या शहराची स्थापना झाली होती. गंगा राजवंश आणि सूर्य राजवंशांनी येथे राज्य केले.
शहर का प्रसिद्ध आहे?
कटक शहर केवळ त्याच्या ऐतिहासिक मंदिरांसाठीच ओळखले जात नाही, तर शहरातील किल्ल्यांचा इतिहासही समृद्ध आहे. आजही येथील किल्ल्यांच्या भव्यतेवरून भूतकाळातील पाने उलगडता येतात. अनेक पर्यटक येथे आवर्जून भेटही देतात.
या शहरात कोणी कोणी राज्य केलं
मध्ययुगीन काळात, 12 व्या शतकात गंगा राजवंशाने येथे राज्य केले. तथापि, 14 व्या शतकात फिरोजशाह तुघलकने ते आपल्या ताब्यात घेतले. काळाचे चक्र पुढे सरकत असताना, ते मुघलांच्या ताब्यातही आले, जिथे त्याला उच्चस्तरीय प्रांताचा दर्जा मिळाला. त्याच वेळी, 1750 च्या सुमारास काही काळानंतर, मराठ्यांनी येथे राज्य केले. जेव्हा देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला तेव्हा 1803 मध्ये ब्रिटिशांनी येथे राज्य केले.1826 मध्ये कटक ओडिशाची राजधानी बनली. देश स्वतंत्र झाल्यावर, ओडिशाची राजधानी कटकवरून भुवनेश्वर करण्यात आली.