AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना रेनकोट, ना छत्री, डीमार्टमध्ये ही गोष्टी घेण्यासाठी ग्राहकांची तुंबड गर्दी..

Dmart : आजकाल डीमार्टमध्ये जाऊन खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. विशेष म्हणजे डीमार्टकडून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वस्तूंवर सवलत दिली जाते. त्यामध्येच आता ग्राहकांनी एका वस्तूची खरेदी करण्यासाठी डीमार्टमध्ये मोठी गर्दी केली.

ना रेनकोट, ना छत्री, डीमार्टमध्ये ही गोष्टी घेण्यासाठी ग्राहकांची तुंबड गर्दी..
DMart
| Updated on: Jul 10, 2026 | 6:55 AM
Share

आजकाल लोक किराणा दुकानात खरेदी करण्यापेक्षा डीमार्टमध्येच जाऊन महिन्याचा किराणा आणि घरात लागणाऱ्या गोष्टी आणण्यावर भर देतात. काही वर्षापूर्वी असे होते की, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार झाल्यानंतर किराणा दुकानात यादी दिली जायची आणि महिनाभर लागणारा किराणा एकदाच घरी आणला जायचा. मात्र, आता तसे राहिले नाही. लोक महिन्याभराचा किराणा आणण्यासाठी डीमार्टमध्ये पोहोचतात. डीमार्टची सर्वात विशेष गोष्टी म्हणजे एकाच छताखाली आपल्या सर्व वस्तू आरामात मिळतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, घरातील प्रत्येक वस्तू आज डीमार्टमध्ये मिळते. मग ते कोणता सण असो किंवा शाळेला सुरूवात प्रत्येक गोष्ट डीमार्टमध्ये असते. सर्वात खास बाब म्हणजे या गोष्टींवर मोठा डिस्काऊंट देखील मिळतोय. ज्यामुळे थेट पैशांची मोठी बचत होते. एमआरपीपेक्षाही स्वस्त वस्तू डीमार्टमध्ये मिळतात.

त्यामध्येच आता पावसाळा सुरू आहे. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस अजिबात झाला नाही. पण जुलै महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून पावसाला सुरूवात झाली. पावसाळ्यात उपयोगी येणाऱ्या अनेक वस्तू सध्या डीमार्टमध्ये मिळत आहेत. छत्री, रेनकोट, बॅग सर्वकाही डीमार्टमध्ये मिळत आहे. मात्र, छत्री आणि रेनकोटपेक्षाही यादरम्यान डीमार्टमध्ये एक गोष्टीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली.

छत्री आणि रेनकोटपेक्षाही पावसाळी चप्पल खरेदी करण्यासाठी डीमार्टमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली. पावसाळी चप्पल अगदी 100 रूपयांपासून डीमार्टमध्ये मिळत आहे. मजबूत आणि टिकावू अशी पावसाळी चप्पल डीमार्टमध्ये मिळत आहे. यासोबतच अनेक डिझाईनच्या पावसाळी चप्पल सध्या डीमार्टमध्ये आहेत. ज्याची तूफान मागणी आहे.

बाहेर जर आपण पावसाळी चप्पल घेण्यासाठी गेलो तर तिथे महागात मिळत आहेत. पण डीमार्टला अगदी स्वस्तामध्ये पावसाळी चप्पल मिळत आहे. फक्त 100 रूपयांमध्ये तुम्हाला डीमार्टमध्ये पावसाळी चप्पल मिळतंय. यासोबतच पावसाळ्यात लागणाऱ्या महत्वाच्य वस्तूवर डीमार्टकडून मोठी सवलत देखील दिली जात आहे. फॅन्सी छत्री, लहान मुलांच्या छत्री मोठ्या प्रमाणात डीमार्टमध्ये बघायला मिळत आहेत. ग्राहकांनी सध्या डीमार्टमध्ये चांगलीच मोठी गर्दी केलीये. इतरही अनेक वस्तूंवर सध्या डीमार्टमध्ये मोठी सवलत मिळत आहे. त्यामध्येच पावसाळी उपयोगी वस्तूंवर अधिक सवलत आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात...
Rohit Pawar : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चावरून सुप्रिया सुळे नाराज? विश्वासात घेतले नाही, पत्रकार परिषदेत फोटोही नव्हता- सूत्र
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी