YouTuber ने खोल समुद्रात कॅमेरा फेकला, पाताळातील असं दृश्य जे जगात कोणीच पाहिलं नसेल…. व्हाल अवाक्

YouTuber ने समोर आणलं विश्वातील असं वास्तव, जे अद्याप कोणी पाहिलंच नसेल... पाताळातील असं दृश्य पाहून व्हाल अवाक्.... व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय

YouTuber ने खोल समुद्रात कॅमेरा फेकला, पाताळातील असं दृश्य जे जगात कोणीच पाहिलं नसेल.... व्हाल अवाक्
underwater mysterious creatures
Updated on: Dec 03, 2025 | 12:02 PM

ब्रह्मांड मध्ये अशा असंख्य छोट्या – मोठ्या गोष्टी आहे, ज्या कोणाला माहिती देखील नसतील… आतापर्यंत असंख्या गोष्टींचा शोध लागला आहे. पण काही वास्तव नव्याने समोर आल्यानंतर आश्चर्य वाटतं आणि तुम्ही – आम्ही कधी पहिल्या देखील नसतील… नैसर्गिक भूदृश्ये आकाशापासून पर्वत, टेकड्या आणि हिरव्या दऱ्यांपर्यंत पसरलेली आहेत. एवढंच नाही तर, पृथ्वीच्या भूपृष्ठभागाच्या 75% भाग व्यापणारे महासागर आणि त्यांची खोली अशा नैसर्गिक जादुई प्राणी आणि प्राण्यांचं घर आहे… असं म्हणायला देखील हरकत नाही… आता नवीन तंत्रज्ञान जलद गतीना विकसीत होत आहे. त्यामुळं संशोधन करणं अधिक सोपं झालं आहे.

आता युट्यूबर बर्नी डिलरस्टोनने त्याच्या कॅमेऱ्याने समुद्राच्या पृष्ठभागावरील अविश्वसनीय दृश्य दाखवले आहेत, जिथे पोहोचणं कोणत्याही सामान्य माणसासाठी कठीण आहे युट्यूबरने इंडोनेशियाच्या किनाऱ्यावर असा एक शोध लावला आहे, जो अवाक् करणारा आहे… कॅमेऱ्यात त्याने पाताळातील दृश्य टिपली आहे. बर्नी डिलरस्टोनने लावलेल्या शोधामुळे सागरी तज्ज्ञ आणि सागरी जीवशास्त्रज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे.

युट्यूबरने समुद्रातील एक खोल आणि गूढ रहस्य उलगडलं आहे, जे संपूर्ण कथेचा महत्त्वाचा विषय असू शकते. युट्यूबर बार्नीने कधीच कल्पना केली नव्हती की, त्याचा शोध त्याला समुद्रात इतक्या खोलवर घेऊन जाईल. बर्नी डिलरस्टोनने त्याचा कॅमेरा समुद्रात फेकला आणि त्यानंतर पाताळातील असं दृश्य समोर आलं, जे कदाचित कोणी पाहिलं देखील नसेल.

युट्यूबरने कैद केलं समुद्रातील असं दृश्य…

युट्यूबरने स्वतःचा कॅमेरा समुद्रात 200 मीटर खाली फेकला, ज्यामध्ये विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती दिसून आल्या. हे दृश्य टिपण्यासाठी त्याला तब्बल दोन रात्री लागल्या, ज्यामुळे या माशांचे व्यावहारिक जीवन देखील समोर आलं आहे. त्यानंतर कॅमेरा 170 मीटर खोलीपर्यंत त्याने आणला, ज्यामध्ये माशांसह विविध प्राणी देखील पाहायला मिळत आहेत, जे आतापर्यंत आपल्याला कधी दिसलेच नव्हते… या शोधामुळे समुग्र तज्ज्ञांमध्ये अनेक विषयांवर चर्चाा सुरु झाली आहे.

आश्चर्यचकित करणारं संशोधन

या संशोधनाबद्दल सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे समुद्राच्या खोलीत दिसणारे हे मासे त्या भागातील नाहीत, तर ते इंडो-पॅसिफिक समुद्र क्षेत्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. जगातील महासागरांमध्ये 20 लाखांहून अधिक सागरी प्रजाती आहेत, परंतु त्यापैकी 2.5 लाखांपेक्षा कमी प्रजातींची ओळख पटली असल्याचा दावा असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. युट्यूबरचा हा शोध इंडो-पॅसिफिक महासागराच्या रहस्यमय जगातील वास्तव समोर आणत आहे.