Knowledge : 1, 2 किंवा 10 रुपयांची नाणी नेहमी गोलच का असतात ? कोणाला माहित्ये उत्तर ?
प्रत्येक व्यक्तीच्या खिशात, पाकिटात किंवा पर्समध्ये 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी असतातच. पण ही नाणी गोल आकाराची का असतात?असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? चला सविस्तर जाणून घेऊया.

बाप बड़ा ना भय्या, सबसे बड़ा रुपय्या… हे गाणं, म्हण आपल्यापैकी बहुतांश लोकांनी ऐकली आहे. पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदाकसम, वो खुदासे कम भी नही.. असंही म्हटलं जातं. आपल्याकडे बरेच पैसे असावेत, भरपूर कमाई, सेव्हिंग्स करावं असं प्रत्येकाला वाटत, सगळेजण त्यासाठी कसून मेहनतही करतात. पण याच पैशांबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला माहीत आहेत का ? डिजीटल पेमेंटचा जमाना असला तरी बरेच लोक आजही कॅशमध्ये व्यवहार करतात. नोटा आणि नाणी नेहमी जवळ बाळगतात.
आपल्यापैकी अनेक लोकांच्या पाकिटात काही नोटा, तसेच सुट्टे पैसे अर्थात नाणी असतातच. 1, 2, 5 , 10 आणि आता तर 20 रुपयांची नाणीही आली आहेत. पण ही नाणी नेहमी गोल का असतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? चला जाणून घेऊया.
जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारची नाणी चलनात आहेत. त्यांची किंमत आणि मूल्यानुसार त्यांची भिन्नता दर्शविली जाते. आकाराच्या बाबतीत, सुरुवातीच्या दशकात चौरस, आयताकृती आणि मध्य-छिद्र असलेली नाणी चलनात होती. पण हळूहळू, चौरस, आयताकृती आणि विविध डिझाइनची नाणी चलनातून गायब होऊ लागली.
आणि त्यानंतर नाण्यांचा आकार गोल झाला आहे. त्या नाण्याचा आकार गोल का असतो हेच समजून घेऊया. प्रत्येक व्यक्तीच्या खिशात विविध किमतीची रुपयांची नाणी असतात. भारतात 1950 साली एक रुपयाचं पहिलं नाणं जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर, 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांदरम्यान, 2 आणि 5 रुपयांची नाणी जारी करण्यात आली. यावेळी जारी केलेल्या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा लोगो आणि दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचे प्रतीक होते.
नाणी गोल असण्यामागंच खास कारण
पैशांची, रुपयांची ही नाणी गोल बनवण्याचं कारण म्हणजे ते कापणे आणि त्यांचा आकार बदलणे कठीण असते. तर आधी चलनात असलेल्या, चौकोनी आणि इतर आकाराच्या नाण्यांचे डिझाइन बदलणे खूप सोपे होते, ज्यामुळे त्यांची किंमत कमी व्हायची, म्हणजे अवमूल्यन व्हायचे. पण गोल नाण्यांचे मूल्य बदलून कमी करता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे विमानतळ, कार्यालये, रेल्वे स्थानके आणि पशुवैद्यकीय तपासणीसह सर्व प्रकारच्या व्हेंडिंग मशीनमध्ये नाणी वापरली जातात. इतर आकाराच्या नाण्यांपेक्षा गोल नाणी वेंडिंग मशीनमध्ये घालणे हेही सोपे आहे. तसेच असेही म्हटले जाते, की हातांनी गोल नाणी मोजणे आणि गोळा करणे सोपे ठरते, म्हणूनच नाण्यांचा आकार गोल ठेवा जातो.
