Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती लिहिली पुस्तकं? तुम्ही कोणती वाचली?

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026: प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती आहे. आज विविध उपक्रमांतून त्यांना अनुयायी, भीमसैनिक अभिवादन करतात. काही ठिकाणी खास वाचन दिवस साजरा करण्यात येतो. पण बाबासाहेबांनी किती पुस्तकं लिहिली हे तुम्हाला माहिती आहे का?

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती लिहिली पुस्तकं? तुम्ही कोणती वाचली?
बाबासाहेब आंबेडकरांनी किती लिहिली पुस्तकं?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 14, 2026 | 4:24 PM

How many books did Babasaheb Ambedkar write: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज `135 वी जयंती आहे. आज चैत्यभूमीपासून ते महू, दीक्षाभूमीपर्यंत अनुयायांची एकच गर्दी आहे. गावा गावात जयंतीचा उत्साह दिसून येत आहे. जयंतीच्या दिवशीच नाही तर त्याच्या अगोदरपासून बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना म्हणून अनेक जण अभिनव उपक्रम राबवतात. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज तयार करण्यासाठी अनेक जण खारीचा वाटा उचलत आहेत. अनेक ठिकाणी अभ्यास आणि वाचनाची आणि वैचारिक प्रबोधनाची ज्ञानज्योत पेटवली जात आहे. हा जयंती उपक्रमाचाचा भाग आहे. पण बाबासाहेबांनी किती पुस्तक लिहिली हे तुम्हाला माहिती आहे का? त्यातील तुम्ही कोणती वाचली हे तुम्हाला आठवतं का?

बाबासाहेबांना किती भाषा अवगत होत्या?

बाबासाहेबांना 9 भाषा अवगत होत्या. त्यातील इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांवर त्यांची सखोल पकड होती. तर फ्रेंच, जर्मनी, पर्शियन, पाली, संस्कृत आणि गुजराती या भाषाही त्यांना माहिती होत्या. त्यातील पुस्तकांचा संदर्भ त्यांनी त्यांच्या पुस्तकातही दिला आहे. बाबासाहेबांच्या काही पुस्तकांचा आजही मोठ्या प्रमाणात खप होतो. महू येथे 14 एप्रिल 1891 साली त्यांचा जन्म झाला होता.

आंबेडकरांची मोठी ग्रंथसंपदा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अंदाजे 32 पुस्तकं लिहिली आहेत. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, समाज, नीती आणि धर्म, राजकारण, बुद्ध आणि त्याचा धर्म यासह विविध विषयावर त्यांनी विपुल लेखण केले आहे. तर बाबासाहेबांचे साहित्य लेखन आणि भाषणे या 22 खंडांमध्ये प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातून त्यांची जिज्ञासा, अभ्यास, चिकित्सक वृत्ती, दांभिकतेवर प्रहार आणि सर्वसामान्यांचा कनवाळूपणा समोर येतो. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचे कौतुक भारतातच नाही तर संपूर्ण जगात होते. त्यांच्या आर्थिक विचारांवर आजही जगभरात अभ्यास सुरू आहे. देशात रिझर्व्ह बँकेची स्थापना असो वा पॉवर ग्रिड स्थापन्याचे त्यांचे विचार असो ते आज देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे ठरले आहेत.

बाबासाहेबांची ग्रंथ संपदा

१. कास्ट्स इन इंडिया

२. स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज

३. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी

४. दी इव्हॅल्यूशन्स ऑफ द प्रॉव्हिन्शल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया

५. वेटिंग फॉर अ व्हिसा

६. अनाइअलेइशन ऑफ कास्ट

७. मिस्टर गांधी अँड द एमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स

८. रानडे, गांधी अँड जिन्ना

९ . थॉट्स ऑन पाकिस्तान

१०. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स

११. महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट

१२. हू वर दि शुद्राज?

१३. स्टेट्‍स अँड मायनॉरिटीज

१४. हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग

१५. द अनटचेबल्सः हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स

१६. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट

१७. बुद्ध अँड कार्ल मार्क्स

१८. कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व इट

१९. बुद्ध अँड दी फ्यूचर ऑफ हिज रिलीजन

२०. बुद्धिज्म अँड कम्युनिज्म

२१. द बुद्धा अँड हिज धम्मा

Follow Us