मगरीला टराटरा फाडते आणि खाते ही आदिवासी जमात, पाहता क्षणीच सिंह ही धूम ठोकतात
El Molo tribe eats the crocodile: जगात अनेक आदिवासी जमाती आहेत. त्यांच्या विचित्र प्रथा आणि आहार पद्धती आहे. या आदिवासी जमातीला मगर खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. जंगलातील अनेक प्राणी हे त्यांचे भक्ष्य आहेत. सिंह, वाघ त्यांना पाहताच धूम ठोकतात.

El Molo tribe eats the crocodile: जगातील काही आदिवासी जमाती या अत्यंत धोकादायक मानल्या जातात. काही तर मानवालाच खातात. तर काही प्राण्यांना खातात. त्यांचे राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या पद्धती विचित्र मानल्या जातात. तर जगातील या आदिवासी जमातीत मगरीची आणि पाघोड्याची शिकार हे शौर्याचे प्रतिक मानले जाते. तर त्यांना पाहताच जंगलाचा राजा सिंह आणि वाघ या सारखे हिंस्त्र प्राणी सुद्धा धूम ठोकतात. कोणती आहे ही आदिवासी जमात?
एल मोलो आदिवासी जमात (El Molo tribe)
एल मोलो आदिवासी जमातीची मगरींमध्ये मोठी दहशत आहे. इतकेच नाही तर पाणघोडे त्यांना पाहताच दूर पळतात अथवा पाण्यात लपतात. केनिया या देशात ही आदिवासी जमात आहे. आता ही लोक बोटावर मोजण्याइतके आहेत. या लोकांची संख्या अगदी 300 ते 400 इतकीच उरली आहे. या शिकाऱ्यांना पाहताच सिंह आणि वाघ सुद्धा दुसरा मार्ग निवडतात. कारण यांच्या मनात आले तर हे प्राणी सु्द्धा त्यांची शिकार होऊ शकतात.
एकदम खतरनाक शिकारी
एल मोलो ही जमात मूळात शिकारीत निष्णात आहे. हे आदिवासी लोक धरण, तलाव, नदीच्या काठी छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. या समाजाचा शौर्याची परिभाषा वेगळी आहे. मगर आणि पाणघोडा यांची शिकार करण्यात जो तरबेज असेल तो या जमातीमधील सर्वात हुशार आणि निष्णात शिकारी मानल्या जातो. तो शूर आणि धाडसी मानल्या जातो. विशेष म्हणजे मगर आणि पाणघोड्याला मारण्यासाठी ते काही मोठ्या हत्याराचा, शस्त्राचा वापर करत नाहीत. हार्पून म्हणजे अणकुचीदार गारगोटीचा वापर करून एक भाला तयार करतात. अगोदर शिकारीला टप्प्यात येऊ देतात आणि मग तिची या हार्पूनने शिकार करतात. दोन ते तीन भाल्यात ते तिची शिकार करतात. त्यानंतर मगर पाण्याबाहेर काढत, ती शिजवून गाव पंगत दिली जाते.
झेड सी आणि मगर अधिक असणाऱ्या पाणथळ जागी त्यांच्या झोपड्या असतात. कित्येक शतकापासून ही जमात पाण्यातील मासे, मगर, पाणघोडे आणि इतर प्राण्यांवर उदरनिर्वाह करतात. केनिया सरकारने मगर आणि पाणघोड्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणल्यापासून आता या जमातीची संख्या झपाट्याने घटली आहे. ही जमात आता गावासह शहरात स्थलांतरीत होत आहे. आता उरलेले एल मोलो लोक हे माशांवर ताव मारते. या जमातीचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे ही आदिवासी जमात अधिक काळ जगत नाही. 30 ते 45 वर्ष हे त्यांचे सरासरी वय आहे. त्यामुळे या जमातीची संख्या घटली आहे.