
आयुष्यात कधीही पैशाची समस्या येऊ नये, यासाठी केवळ चांगली कमाई करणे आवश्यक नाही तर कमावलेल्या पैशाचे व्यवस्थापन करणे देखील आवश्यक आहे. असे ही अनेक लोक आहेत जे चांगली कमाई करूनही आर्थिक अडचणीत अडकतात. याचे कारण आर्थिक नियोजन न करणे किंवा ते चुकीच्या पद्धतीने करणे हे आहे.
फायनान्सशी संबंधित अनेक गैरसमज असणारे अनेक जण आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच गैरसमजांबद्दल सांगणार आहोत, जे बहुतेक लोकांच्या मनात असतात आणि त्यांच्या गैरसमजुतींमुळे त्यांचे आर्थिक नियोजन कमकुवत होत असते. चला जाणून घेऊया.
बहुतेक लोक विम्याला व्यर्थ खर्च मानतात, परंतु विमा भविष्यात मोठ्या खर्चापासून वाचवू शकतो. विशेषत: आजच्या युगात आरोग्य विमा अधिक महत्त्वाचा बनला आहे कारण आजची जीवनशैली अतिशय वाईट झाली आहे, ज्यामुळे अनेक आजार वाढत आहेत. जर तुम्ही विमा घेतला नाही तर भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीत तुमची आयुष्यभराची कमाई वाया जाऊ शकते.
बहुतेक लोक केवळ नोकरीवर अवलंबून असतात परंतु केवळ एका स्त्रोतावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. आजच्या युगात नोकरीसोबतच उत्पन्नाचे अधिक स्रोत मिळू शकतात. जसे फ्रीलान्स काम करणे किंवा सोशल मीडियातून कमाई करणे इत्यादी.
आजकाल तरुणाई फारच कमी बचत करत आहे आणि आपला संपूर्ण पगार खर्च करत आहे, पण उत्पन्नाचा काही भाग वाचवून गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. अशावेळी दर महिन्याला बजेट बनवून थोडी बचत करून चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा.
तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल तर वेळोवेळी बचत करा आणि कर्जाची परतफेड करा. यामुळे तुम्ही तुमच्या व्याजाचे लाखो रुपये वाचवू शकता.
आपण आपला आपत्कालीन निधी आपल्या बचत खात्यात ठेवू शकता किंवा आपण आपला निधी अशा ठिकाणी गुंतवू शकता जिथे आपण कोणताही तोटा न होता तो निधी त्वरीत काढू शकता. अशावेळी तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड सेव्हिंग अकाउंट, लिक्विड म्युच्युअल फंडात ठेवू शकता किंवा एफडीमध्ये स्वीप करू शकता.
इमर्जन्सी फंडची Invest करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु, प्रामुख्याने ३ पर्यात सर्वात जास्त चर्चेत असतात. बचत खाते (Saving Account) बचत खात्यामध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला 3-4 टक्क्यांपर्यंत परतावा (Returns) मिळू शकतो. मुदत ठेव (Fix Deposit) मुदत ठेवीच्या खात्यामध्ये जर पैसे ठेवले तर 5-7 टक्क्यांपर्यंत तुम्हाला परतावा मिळण्याची शक्यता असते. लिक्विड म्युच्युअल फंड, तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे लिक्विड म्युच्युअल फंड. यामध्ये तुम्हाला 6-7 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. CA रोहित ज्ञानचंदाणी हे सांगतात की लिक्विड म्युच्युअल फंड हा प्रकार सर्वात जास्त फायदा करुन देणारा आहे. यामध्ये तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो आणि तुम्ही केव्हाही तुमचे पैसे काढू शकता.