Flying snakes: या सापाने धुमाकूळ घातलाय, सर्वात विषारी साप कोणता? उडणारा की सरपटणारा?

Flying Snakes Facts: जगात काही सापांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या नावानेच अनेकांचा थरकाप उडतो. नुसतं फूस जरी आवाज झाला तरी अनेकांची घाबरगुंडी उडते. सापाला पाहिल्यावरही अनेक जण घामाघूम होतात. सर्वात विषारी साप सरपटणारा असतो की उडणारा?

Flying snakes: या सापाने धुमाकूळ घातलाय, सर्वात विषारी साप कोणता? उडणारा की सरपटणारा?
हवेतील साप की जमिनीवरील, कोणता सर्वाधिक धोकादायक?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 08, 2026 | 3:44 PM

Flying Snakes Facts: उडणारे, उडते साप पाहून अनेकांची दा‍तखिळी बसते. अनेकांची बोबडी वळते. कारण असे प्रकार फार दुर्मिळ असतात. पण जमिनीवरून सरपटणाऱ्या सापांपेक्षा हवेत उडणारे साप अत्यंत धोकादायक मानले जातात. हे साप प्रामुख्याने दक्षिण आणि दक्षिपूर्व आशियात आढळतात. त्यांना सरीसूप असेही म्हटले जाते. क्राईसोपेलिया जीनस या प्रकारातील हे साप असतात.

विषाची परीक्षा नको

उडणारा साप तसा जास्त विषारी नसतो. त्यांचे विष हे पाल, बेंडूक आणि पक्षी यांना बेशुद्ध करण्यापूरते वापरले जाते. छोट्या प्राण्यांसाठी या विषाचा वापर होतो. जर चुकून या सापाने माणसाला दंश केला. तर त्याची सौम्य लक्षणं दिसतात. त्यात सूज येणे, घेरी येणे, चक्कर येणे, दंश केलेली जागा सुजते, डोकेदुखी होते. अति विषारी सापापेक्षा या विषाची परीक्षा घेणे सुद्धा चांगले मानले जात नाही. कारण कोणत्याही विषाची परीक्षा करुच नये.

विषारी सापांपेक्षा दात असतात वेगळे

उडणाऱ्या सापाचे दात थोडे वेगळे असतात. या दातांची संरचना विषारी आणि सरपटणाऱ्या सापासारखी नसते. उडत्या सापाचे विषारी दात हे जबड्यात सर्वात मागे असतात. त्यामुळे एखादा प्राणी अथवा माणसाला दंश केल्यावर त्यांच्यावर विषाचा परिणाम होत नाही. दात पाठीमागे असल्याने प्राणी चावताना त्याला या विषाने भूल पडते. त्यामुळे माणसाला याच्या विषाचा परिणाम होत नाही.

हा साप उडतो कसा?

साप उडत नाही. तर तो त्याच्या शरीराला चपट करतो. हवेच्या प्रतिकाराचा वापर करून तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी घेतो. या सापाना याची सवय झाल्याने ते जवळपास 100 मीटरपर्यंत झेप घेतात. त्यामुळे ते हवेत उडत असल्याचे दिसते. शिकारीपासून वाचण्यासाठी आणि भक्ष्याला पकडण्यासाठी या सापांनी ही नैसर्गिक कला शिकून घेतली आहे. उडणारे साप हे मनुष्यासाठी खतरनाक मानले जातात. अर्थात त्यांच्या दंशामुळे जखम होऊ शकते. पण विष चढत नाही. त्या विषाचा मनुष्यावर मोठा परिणाम होत नाही. मात्र जमिनीवर सरपटणारे साप विषारी असल्यास आणि त्यांनी दंश केल्यास जीव जाऊ शकतो.

Follow Us