AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : वाळवंटाने घेरलेल्या राजस्थानमधील सर्वात लांब नदी कोणती? लांबी वाचून हैराण व्हाल

Rajasthan GK : अनेकांच्या मनात असा प्रश्न आला असेल की या वाळवंटी राज्यातील सर्वात लांब नदी कोणती? अनेकांना वाटते की, लूनी किंवा चंबळ ही राजस्थानमधील सर्वात लांब नदी आहे. मात्र हे उत्तर चुकीचे आहे.

GK : वाळवंटाने घेरलेल्या राजस्थानमधील सर्वात लांब नदी कोणती? लांबी वाचून हैराण व्हाल
Rajasthan Longest RiverImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 13, 2026 | 6:33 PM
Share

राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे, या राज्याचा मोठा भाग विस्तीर्ण वाळवंटाने वेढलेला आहे. अनेकांच्या मनात असा प्रश्न आला असेल की या वाळवंटी राज्यातील सर्वात लांब नदी कोणती? अनेकांना वाटते की, लूनी किंवा चंबळ ही राजस्थानमधील सर्वात लांब नदी आहे. मात्र सरकारी आकडेवारी आणि भूजल सर्वेक्षण अहवालांनुसार, संपूर्णपणे राजस्थान राज्यातून वाहणारी सर्वात लांब नदी म्हणजे बनास नदी होय. या नदीची एकूण लांबी सुमारे 512 किलोमीटर आहे. या नदीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राजस्थानातील सर्वात लांब असणाऱ्या बनास नदीचा उगम राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगडजवळ असलेल्या अरावली पर्वतरांगेतील खमनोर टेकड्यांमध्ये होतो. त्यानंतर ही नदी अजमेर, भीलवाडा, टोंक, बूंदी आणि सवाई माधोपूर जिल्ह्यांतून वाहत जाऊन सवाई माधोपूर जिल्ह्यातील रामेश्वरजवळ चंबळ नदीला मिळते. या नदीच्या प्रवाहाची लांबी तब्बल 512 किलोमीटर आहे.

बनास नदीचे महत्त्व

राजस्थान वन विभाग आणि पीएचईडीच्या जलस्रोत अहवालांमध्ये बनास नदीला जंगलाची आशा (Hope of the Forest) असे संबोधले गेले आहे. या नदीचे जलग्रहण क्षेत्र सुमारे 45,833 चौ. किमी आहे, जे राज्याच्या जलसंपत्तीत महत्त्वाचे योगदान देते. बनास नदी ही प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असलेली हंगामी नदी आहे. पावसाळ्यात तिचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो आणि राज्यातील शेती, पिण्याचे पाणी व पर्यावरणीय संतुलनासाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते.

बिसलपूर धरणामुळे मोठा लाभ

भारत सरकारच्या जलसंपदा मंत्रालय आणि राजस्थान सरकारच्या अहवालांनुसार, बनास नदीचे खोरे राज्याच्या पूर्व व आग्नेय भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. टोंक जिल्ह्यातील बिसलपूर धरण हे बनास नदीवरील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या धरणातून जयपूरसह अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. याशिवाय रजोली, नांगल आणि मोरई ही धरणेही बनास नदीवर उभारण्यात आली आहेत.

लूनी नदी

पश्चिम राजस्थानातील थार वाळवंटातील लूनी नदी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अजमेरमधील नाग पर्वतावरून उगम पावणारी ही नदी सुमारे 495 किलोमीटर वाहते. बालोतरा परिसरापर्यंत तिचे पाणी गोड असते, त्यानंतर ते खारट होत जाते आणि शेवटी कच्छच्या रणात विलीन होते. लूनी नदीचे जलग्रहण क्षेत्र सुमारे 37,796 चौ. किमी आहे. ही नदीही राजस्थानातील एक प्रसिद्ध नदी आहे.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त