GK: मारुतीरायाच्या गदेचे नाव काय? हनुमानाला कुणी दिली होती ती गदा?

Hanumana Mace Gada: महाशक्तीशाली मारुती राया हे अनेकांचे दैवत आहेत. आखाड्यात, जीममध्ये जाणाऱ्यांचे, बलोपसकांचे ते आराध्य दैवत आहेत. त्यांच्याकडे नेहमी गदा असते. या गदेचे नाव आहे तरी काय? ही गदा त्यांना कुणी दिली?

GK: मारुतीरायाच्या गदेचे नाव काय? हनुमानाला कुणी दिली होती ती गदा?
हनुमानाच्या गदेचे नाव काय
| Updated on: Mar 14, 2026 | 2:50 PM

Hanumana Mace Gada Kaumodaki: महाशक्तीशाली हनुमान हे बलोपसकांचे आराध्य दैवत आहेत. इतकेच नाही अनेक जण भीती वाटायला लागली की अगोदर मारुतीरायाचा धावा करतात. त्यांच्याकडे अनंत शक्ती आहेत. धर्माच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांचा नायनाट करण्यासाठी या शक्तींचा ते वापर करतात अशी मान्यता आहे. पांडवातील भीम याच्याकडे 10,000 हत्तीं इतकी शक्ती होती असे म्हटले जाते. पण तोही हनुमानाची शेपूट सुद्धा हलवू शकला नाही अशी कथा आपण वाचली असेल. तर या अनेकांच्या अराध्य दैवताकडे नेहमी एक गदा असते. या गदेचे नाव काय आहे आणि ती त्यांना कुणी दिले हे अनेकांना माहिती नाही. काय आहे त्याचे उत्तर?

मारुतीरायाच्या गदेचे नाव काय?

मारुतीराया बलभीमा, अशी प्रार्थना या इष्ट दैवताची करण्यात येते. मारुती रायांची महिमा अनेक ग्रंथात येते. त्यांच्यावर अनेक स्तुतीकाव्य आणि त्यांच्या रामभक्तीचे संस्कार देशातील अनेक पिढ्यावर झाले आहेत. ते एकनिष्ठ आणि रामभक्त असल्याचे आपण वाचतो. त्यांच्याकडून शक्ती, भक्ती हे गुण घ्यावेत असे म्हटले जाते. तर हनुमानाच्या गदेचे नाव कौमोदकी (Kaumodaki) असे आहे. ही गदा अत्यंत बलाढ्य आणि वजनदार असल्याचे मानले जाते. या गदेच्या प्रहाराने अनेक भयावह राक्षस आणि दानवांचा पराभव झाला आहे.

हुनमानाला ही गदा दिली कुणी?

तर मारुतीरायाला ही गदा दिली कुणी असा सवाल अनेकांना पडतो. धार्मिक ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथानुसार, हनुमानाला ही कौमोदकी गदा कुबेर महाराजांनी दिली. ही काही साधारण गदा नाही. या गदेत अनेक अलौकिक आणि अद्भूत शक्ती आहेत. जेव्हा हनुमान बाल्यावस्थेत होते. तेव्हा याच शक्तींनी त्यांनी अनेकांना अचंबित केले होते. देवी-देवतांनाही त्यांच्या अचाट,अफाट, सहासी व्यक्तिमत्वाचे कौतुक वाटत होते. तेव्हा कुबेर महाराजांनी त्यांना ही गदा भेट दिली होती. ही गदा देताना हनुमान हे सदैव अजेय असतील असे कुबेर महाराजांनी म्हटले होते.

वामहस्तगदायुक्तम नावाचा अर्थ काय?

महाराष्ट्रात मारुतीरायाची प्रत्येक गावी मंदिरं आहेत. स्वामी रामदासांनी त्यातील अनेक मंदिरांचे काम केल्याचे म्हटले जाते. अनेक गावात आपण पंचमुखी हनुमानाची मूर्ती अथवा प्रतिमा पाहिली असेल. या पंचमुखी प्रतिमेत त्यांच्याकडे खड़ग, खट्वआंग, पर्वत, अंकुश, त्रिशूल, पाश, मुष्टि, स्तंभ, गदा आणि वृक्ष दिसून येतो. काही ठिकाणी हनुमानाचे वर्णन ‘वामहस्तगदायुक्तम’ असे करण्यात आले आहे. हनुमान डाव्या हातात गदा धरून आहेत, त्यामुळे त्यांना ‘वामहस्तगदायुक्तम’ असे म्हटले जाते

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us