रंग बदलणारा मासा कधी पाहिलाय का? व्हिडिओ पाहून तुमचा ही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

जगात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या नाहीत. या जगात अनेक गोष्टी आश्चर्याने भरलेल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मासा क्षणाक्षणाला त्याचा रंग बदलताना दिसत आहे. कोणता आहे तो मासा जाणून घ्या.

रंग बदलणारा मासा कधी पाहिलाय का? व्हिडिओ पाहून तुमचा ही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 7:10 PM

मुंबई : निसर्गात असे अनेक प्राणी आहेत ज्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. अनेक प्राणी तर आपण पाहिले ही नसतील. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये एक मासा असा ही आहे जो त्याचा रंग बदलू शकतो. सरडा हा रंग बदलतो हे तुम्ही ऐकलं असेल तर मासा कसा काय रंग बदलतो हे जाणून घ्यायला किंवा पाहायला तुम्हाला ही आवडेल. या माशाचे नाव टाईलफिश आहे. त्याला फ्लॅशिंग टाईलफिश असे ही म्हटले जाते. या माशाचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हा मासा एका क्षणात कसा रंग बदलत आहे हे तुम्ही पाहून शकता. हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X  वर @ThebestFigen नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ 11 हजारांहून अधिक लोकांनी  पाहिला आहे.

मासे रंग कसे बदलतात?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @dreamsNscience नावाच्या एका युजरने सांगितले की, त्याच्या त्वचेतील विशेष प्रथिनांच्या मदतीने त्यांच्यात रंग बदलण्याची क्षमता आहे. जी वेगवेगळ्या तरंगलांबीमध्ये प्रकाश प्रतिबिंबित करू शकते.’

व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया?

व्हिडिओ पाहून एक युजर म्हणतो की, असा मासा असू शकतो हे मला आधी माहित नव्हते. एकाने लिहिले- समुद्रात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही.

तुम्हाला या माशाबद्दल माहित होते का. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नक्कीच पोस्टवर प्रतिक्रिया देऊ शकता.

Non Stop LIVE Update
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.