स्वास्तिकला तर शुभ मानले जाते मग हे चिन्ह नाझीवादाशी कसे जोडले गेले, या कारणांमुळे कॅनडा लावत आहे बंदी!

| Updated on: Feb 21, 2022 | 6:04 PM

हिटलरच्या साम्राज्यापूर्वी युरोप आणि अमेरिका देशांमध्ये स्वास्तिक हे चिन्ह प्रेम आणि मंगलेतेचे प्रतीक मानले जायचे. हिटलर ने 1930 च्या दशकात या चिन्हाचा वापर नाझी सेनाचे प्रतीक म्हणून केला.

स्वास्तिकला तर शुभ मानले जाते मग हे चिन्ह नाझीवादाशी कसे जोडले गेले, या कारणांमुळे कॅनडा लावत आहे बंदी!
Follow us on

मुंबईः स्वास्तिक चिन्ह( swastik sign) पाहताच आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारच्या भावना येतात? अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला गेला तर जगजाहीर आहे की, जेव्हा आपण कधीही स्वास्तिक चिन्ह पाहतो तेव्हा मनामध्ये श्रद्धा भाव निर्माण होतो परंतु तुम्हाला जाणून हैराणी होईल कि, कॅनडा (canada government) या शुभ चिन्हावर लवकरच बँन म्हणजेच बंदी लावण्याच्या तयारीत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, स्वास्तिक हे चिन्ह सनातन धर्मामध्ये शुभ आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. संस्कृतमध्ये स्वास्तिकचा अर्थ सौभाग्याशी जोडला गेलेला आहे.

या चिन्हाला हिंदू धर्मामध्ये शुभ चिन्ह मानले जाते. अनेकदा पूजा-अर्चना दरम्यान, जागरण ,भजन -गोंधळ व अन्य अध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये मंगलसमयी स्वास्तिकची रांगोळी काढली जाते. हे चिन्ह फक्त भारतामध्येच नाही तर युनान,नेपाळ, भूतान, चीन अन्य देशांमध्ये सुद्धा हे चिन्ह शुभ मानले जाते. स्वास्तिक चिन्ह मंगलतेचे आणि धार्मिक कार्याचे प्रतिक असून सुद्धा कॅनडा का बरे या चिन्हावर बंदी (ban) लावत आहे? असा अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे. चला तर मग जाणून घेऊया एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाबद्दल..

विरोध दर्शविणारा नाझीवाद

कॅनडामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनिवार्य वॅक्सिनबद्दलच्या विरोधात हजारो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर प्रदर्शन करत आहेत. प्रदर्शन करते वेळी त्यांच्या हातामध्ये स्वास्तिक चिन्ह असलेले झेंडे सुद्धा पाहायला मिळत आहेत. या झेंड्यांच्या कारणामुळेच कॅनडामध्ये बंदी लावण्याची तयारी सुरू आहे. कॅनडामध्ये स्वास्तिक चिन्हावर बंदी लावण्यासाठी बिल लागू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कॅनडा सरकारचे असे म्हणणे आहे की, कॅनडा हा देश लोकशाही मूल्यांवर चालणारा देश आहे आणि येथे विरोध दर्शविणारा नाझीवाद हा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. अशावेळी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की, स्वास्तिक या चिन्हाला कधीपासून नाझीवादाचे प्रतीक मानायला लागले ?..

स्वास्तिकः नाझीवादाचे प्रतीक

1930 नंतर स्वास्तिक हे चिन्ह नाझीवादाचे प्रतीक म्हणून पश्चिमेकडील देशांमध्ये प्रामुख्याने दिसून आले. खरेतर हिटलरने नाझी सेनेसाठी स्वास्तिक या चिन्हाचा वापर केला. एवढेच नाही तर स्वतः हिटलर आपल्या दंडावर नेहमी हे चिन्ह लावत असे. स्टीवन हेलर यांनी या चिन्हाबद्दलचे ग्राफिक डिझाईन संदर्भातील एक पुस्तक देखील लिहिले त्या पुस्तकाचे नाव ‘द स्वास्तिकः सिम्बल बियॉन्ड रिडेम्पशन’ असे आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर प्रकाश उप्रेती या पुस्तकाचा संदर्भ देऊन सांगतात की, स्वास्तिक या चिन्हांची ओळख आधी नाझीवादाशी जोडली गेलेली नव्हती.

अमेरिकेत स्वास्तिक चिन्ह शुभ आणि प्रेमाचे प्रतीक

डॉ उप्रेती यांच्या मते, हिटलरच्या साम्राज्याआधी युरोप आणि अमेरिकामध्ये स्वास्तिक चिन्ह शुभ आणि प्रेम यांचे प्रतीक मानले जात होते. हिटलरने 1930 दशकांमध्ये या चिन्हाला आपल्या नाझी सेनासाठी प्रतीक म्हणून वापरले. हिटलर स्वतःला आर्य समजत होता आणि याहुदी लोकांबद्दल हिटलरच्या मनात खूपच राग आणि संताप होता. जेव्हापासून स्वस्तिक हे चिन्ह नाझीसेनाचे प्रतीक चिन्ह बनले, तेव्हापासून नाझीवाद म्हणून या चिन्हाकडे अनेकजण पाहू लागले.

चिन्हावर जागतिक बंदी लावण्याचे प्रयत्न

स्वास्तिकची ओळख नाझीवाद आणि हिटलरशी संबधित असल्यामुळे जर्मनीने या चिन्हाला दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या देशामध्ये बंदी लावली होती. जर्मनीने 2007 मध्ये या चिन्हावर जागतिक बंदी लावण्याचे सुद्धा प्रयत्न केले होते परंतु या चिन्हावर बंदी लावण्यात त्यांना यश काही प्राप्त झाले नाही. स्वास्तिक चिन्हाचे शुभ प्रतीक व्यतिरिक्त अन्य उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये वास्तुकला इत्यादींमध्ये सुद्धा स्वास्तिकचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. एकदातर पेय कंपनी कोकाकोलाने सुद्धा आपल्या बॉटलवर स्वास्तिक चिन्हाचा वापर केला होता.

संबंधित बातम्या

Salary Account | सारखी नोकरी बदलता? जुनं सॅलरी अकाऊंट बंद करायला विसरु नका, नाहीतर…

Super 30 प्रमाणेच भारतीय सेना आता होईल सुपर 50… काश्मिरातील मुलांचं स्वप्न साकार होणार

ताजमहाल सारखी वास्तू पुन्हा बनवली जाऊ नये म्हणून शाहजहानने कामगाराचे हात छाटले? खरं कारण काय?