AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या पंतप्रधानांचा दररोजचा खर्च किती? आकडे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

नरेंद्र मोदी हे आपल्या शिस्तबद्ध आणि साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जात असले तरी त्यांच्या पदाच्या महत्त्वामुळे त्यांच्यावर होणारा खर्च प्रचंड आहे. विशेषतः सुरक्षा व्यवस्थेसाठी दररोज किती रक्कम खर्च केली जाते, हे जाणून तुम्हीही चकीत व्हाल. चला तर मग, जाणून घेऊया भारताच्या पंतप्रधानांवर दररोज किती खर्च होतो आणि त्यामागे काय व्यवस्था असते.

भारताच्या पंतप्रधानांचा दररोजचा खर्च किती? आकडे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
डिजिटल इंडिया
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 23, 2025 | 7:10 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीयदृष्ट्या जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच ते आपल्या साध्या जीवनशैलीसाठी आणि कठोर दिनचर्येसाठीही ओळखले जातात. त्यांच्या आहार, वेशभूषा आणि काम करण्याच्या पद्धतीने अनेकांना आकर्षित केलं आहे. मात्र अनेकांना सतत एकच प्रश्न पडतो की इतक्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा सरकारदररोज किती खर्च करते? आज आपण याच प्रश्नाचं विश्लेषण करूया.

पंतप्रधान पद हे भारतातील सर्वाधिक महत्त्वाचं पद आहे. देशाच्या सुरक्षा, धोरणं, आंतरराष्ट्रीय संबंध, आणि अंतर्गत प्रशासन यासारख्या सर्व जबाबदाऱ्या पंतप्रधानांकडे असतात. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन सुरक्षेपासून ते प्रवासापर्यंत सर्व गोष्टी सरकारच्या माध्यमातून अत्यंत नियोजितपणे पार पाडल्या जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एसपीजी’ म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सुरक्षा कवच मिळालं आहे. हे सुरक्षा कवच अत्यंत उच्च दर्जाचं असून यामध्ये २४ प्रशिक्षित एसपीजी कमांडोंचा समावेश असतो, जे २४x७ त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवतात. 2022-23 साली एसपीजीसाठी भारत सरकारने 385.95 कोटी रुपये खर्च केले होते. म्हणजेच दररोज सुमारे 1.17 कोटी रुपये फक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खर्च केले जातात. जर आपण याचा तासागणिक हिशोब केला तर दर तासाला 4.90 लाख रुपये खर्च होतो.

पंतप्रधानांना देशाच्या विविध भागांमध्ये आणि परदेशात देखील वारंवार प्रवास करावा लागतो. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यासाठी विशेष सुरक्षेची, सरकारी विमानांची आणि कार्यक्रम व्यवस्थापनाची आवश्यकता असते. या सर्व गोष्टींचा खर्च केंद्र सरकार उचलते.

मात्र जेव्हा त्यांच्या व्यक्तिगत आहाराविषयी विचार केला जातो, तेव्हा आश्चर्याची बाब म्हणजे – पंतप्रधान मोदी यांचा आहार अत्यंत साधा आणि नियमबद्ध आहे. 2015 साली एका आरटीआयच्या माध्यमातून उघड झालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या आहाराचा खर्च स्वतः करतात. म्हणजे सरकार त्यांच्या खानपानासाठी एक पैसाही खर्च करत नाही.

सरकार त्यांच्या निवासस्थान, सुरक्षा, कार्यालयीन कामकाज, प्रवास आणि अधिकृत दौऱ्यांचा खर्च उचलते. पण त्यांचं खासगी जीवन अतिशय शिस्तबद्ध असून त्यात कोणताही अपव्यय होत नाही.

Follow Us
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा