AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या जवळ असलेले दागिने खरे की खोटे? कोणालाही न विचारता घरच्या घरी करा टेस्ट

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी HUID कोड आणि इतर घरगुती पद्धतींचा वापर कसा करावा, याबद्दलची सविस्तर माहिती आणि बनावट हॉलमार्कपासून वाचण्याचे उपाय.

तुमच्या जवळ असलेले दागिने खरे की खोटे? कोणालाही न विचारता घरच्या घरी करा टेस्ट
gold
| Updated on: Apr 27, 2026 | 4:50 PM
Share

सोनं खरेदी करणं हा केवळ हौसेचा विषय नसून ती एक मोठी आर्थिक गुंतवणूक असते. मध्यमवर्गीय कुटुंब वर्षानुवर्षे मेहनत करुन पैसे साठवून दागिने खरेदी करतात. पूर्वी सोन्याच्या शुद्धतेसाठी केवळ सराफाच्या शब्दावर विश्वास ठेवला जायचा, पण ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सरकारने हॉलमार्किंगचा नियम आणला. मात्र, आता फसवणूक करणाऱ्यांनी बनावट हॉलमार्कचे शिक्के मारून ग्राहकांना लुटण्याचा नवा मार्ग शोधला आहे.

अनेकदा २२ कॅरेटचे म्हणून विकले जाणारे दागिने नंतर १८ किंवा १४ कॅरेटचे निघतात. या मोठ्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजकाल लेझर प्रिंटिंगच्या सहाय्याने दागिन्यांवर हुबेहूब हॉलमार्कसारखे दिसणारे शिक्के मारले जातात. उघड्या डोळ्यांनी खरा आणि खोटा शिक्का ओळखणे सामान्य ग्राहकासाठी अशक्य असते. ही फसवणूक तेव्हाच लक्षात येते जेव्हा आपण ते दागिने विकायला किंवा मोडून दुसरे घ्यायला जातो.

HUID कोड तपासा

सोन्याची शुद्धता तपासण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे HUID (Hallmark Unique Identification) क्रमांक. हा ६ अंकी अक्षरी आणि सांख्यिकी कोड असतो (उदा. AZ1234) तुमच्या मोबाईलवर सरकारी BIS Care App डाऊनलोड करा. त्यात Verify HUID या पर्यायावर जाऊन दागिन्यावरील ६ अंकी कोड टाका. जर कोड खरा असेल, तर त्या दागिन्याबद्दलची सर्व माहिती कधी हॉलमार्क झाले, शुद्धता किती हे स्क्रीनवर दिसेल. माहिती न दिसल्यास ते सोने बनावट असू शकते.

सोनं हा अचुंबकीय धातू आहे. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक शक्तिशाली चुंबक दागिन्या जवळ न्या. जर दागिना चुंबकाकडे आकर्षित झाला किंवा त्याला चिकटला, तर समजावे की त्यात लोखंड किंवा निकेलसारख्या स्वस्त धातूंची भेसळ आहे. सोन्याची घनता इतर धातूंच्या तुलनेत खूप जास्त असते. एका पाण्याचे भांडे आणि वजनकाटा वापरून ही चाचणी करता येते. जर दागिना दिसायला मोठा असेल पण वजनाला हलका वाटत असेल, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.

दागिने खरेदी करताना हे नेहमी लक्षात ठेवा

घरातील एक कच्ची सिरॅमिक प्लेट (Unglazed Ceramic) घ्या. त्यावर तुमचा दागिना हलक्या हाताने घासा. जर प्लेटवर सोनेरी रेषा उमटली, तर सोने शुद्ध आहे. जर प्लेटवर काळी किंवा गडद रेषा पडली, तर त्यात भेसळ असल्याचे समजावे. दागिने खरेदी करताना नेहमी अधिकृत आणि नामवंत सराफाकडूनच खरेदी करा आणि पक्के जीएसटी बिल मागण्यास विसरू नका. बिलावर दागिन्याचे वजन, कॅरेट आणि HUID कोडची नोंद असल्याची खात्री करा.

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ