
No ATM Country : भारतात आता जागोजागी एटीएमची सेवा मिळते. असं कोणतंही शहर नाही जेथे एटीएमचे जाळे पसरलेले नाही. अनेक देशांमध्ये आता एटीएम ही सामान्य सेवा झाली आहे. तसा एटीएमचा वापर ही कमी होत चालला आहे. कारण आता लोकांचा कल डिजीटल पेमेंटवर आहे. कोणत्याही दुकानावर गेले की व्यक्ती फोन काढतो आणि यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करुन टाकतो. पण तुम्हाला माहितीये का या जगात असाही एक देश आहे जेथे अजून एटीएमची सेवा देखील नागरिकांना मिळालेली नाही. इतकंच नाही तर अनेक नागरिकांकडे अजून मोबाईल फोन देखील नाही. ज्यामुळे लोकांना फोन करण्यासाठी अजूनही पीसीओ बूथवर जावे लागते.
आम्ही ज्या देशाबद्दस बोलत आहेत त्या देशाचं नाव आहे इरिट्रीया. हा देश आफ्रिका खंडात आहे. भारतात आता लोकांची वार्षिक उलाढाल लाखो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पण या देशात लोकांना एका महिन्यात फक्त 23,500 रुपयेच त्यांच्या खात्यातून काढता येतात. जर लग्नासारखा एखादा मोठा कार्यक्रम असेल तर काही सूट दिली जाते. पण त्यावरही मर्यादा आहेत
एरिट्रियामध्ये एरिटेल नावाची टेलिकॉम कंपनी आहे. पण या कंपनीवर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण आहे. मोबाईल फोनसाठी जर सिम घ्यायचे असेल तर ते देखील अवघडच. सिम घेण्यासाठी देखील स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. सिम घेतले तरी सिममध्ये मोबाइल डेटा नसल्यामुळे त्यावर इंटरनेट देखील वापरू शकत नाही.
पर्यटकांना तात्पुरते सिम घ्यायचे असल्यास त्यासाठी आधी अर्ज करावा लागतो. त्यानंतर 3-4 दिवसात त्यांना सिम मिळते. येथे लोकांना फक्त वायफायवर नेट वापरता येते. पण इंटरनेट देखील खूपच स्लो आहे. इरिट्रियाच्या लोकसंख्येपैकी फक्त एक टक्के लोक इंटरनेट वापरतात.
एरिट्रियन नागरिकांना फक्त तेच पाहता येथे जे येथील सरकारला दाखवायचे असते. इथल्या माध्यमांना स्वतंत्रपणे काहीही लिहिण्याचा अधिकार नाही. सरकारवर टीका करणाऱ्यांना येथे तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
लष्करी सेवा पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत येथील लोकांना पासपोर्टही मिळत नाही. पासपोर्ट मिळाल्यानंतर देश सोडणे ही सोपे नाही. कारण सरकार सहजासहजी व्हिसा देत नाही. कारण सरकारला भीती आहे की लोकं देशात परत येणार नाही. अशा प्रकारे येथील लोकांना अनेक समस्यांसह जगावे लागते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबत कमेंट करुन नक्की कळवा.