श्रावण महिन्यात दारू पिऊ नये, मांस खाऊ नये; जाणून घ्या शास्त्रीय कारण

श्रावण महिन्यात दारू सोडणे, मटन न खाणे याला फक्त धार्मिक बाबीचं जबाबदार आहेत, असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणातून श्रावण महिन्यात दारू, मटन, मसाल्याचे प्रमाण कमी केले पाहिजे.

श्रावण महिन्यात दारू पिऊ नये, मांस खाऊ नये; जाणून घ्या शास्त्रीय कारण
| Updated on: Jul 13, 2023 | 11:38 PM

श्रावण महिन्यात लोकं दारू पिणे सोडतात. मटन खाणे सोडतात. यासाठी ते कारण देतात. श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना समजला जातो. यामुळे दारू पिणे, मटन खाणे वर्ज्य समजले जाते. परंतु, काही लोकं हे मानत नाहीत. ते दारू पितात. मटन खातात. असं करणं त्यांच्या भविष्यासाठी नुकसानदायक ठरतं.

श्रावण महिन्यात दारू सोडणे, मटन न खाणे याला फक्त धार्मिक बाबीचं जबाबदार आहेत, असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणातून श्रावण महिन्यात दारू, मटन, मसाल्याचे प्रमाण कमी केले पाहिजे.

 

प्रजननाचा महिना

श्रावण हा प्रजनन म्हणजे ब्रिडिंगचा महिना समजला जातो. प्रेग्नंट जिवास खाल्यास त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतात. प्रेग्टनंट जीव खाल्यास हार्मोनल डिस्टरबन्स होते. यामुळे भविष्यात आजाराचा सामना करावा लागतो.

पाचनशक्ती कमजोर

श्रावण महिन्यात आकाश ढगाळलेले असते. सूर्याचे दर्शन फारच कमी होते. अशावेळी आपली पाचनशक्ती कमी होते. नॉनवेजला तामसी जेवण मानले जाते. असे जेवण लवकर पचत नाही. यामुळे आरोग्याशी संबंधित तक्रारी सुरू होतात. यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.

संसर्गाचा धोका

श्रावण महिन्यात नेहमी पाऊस पडतो. त्यामुळे आजारांचे संक्रमण जास्त होते. जिवाला आपले शिकार बनवले जाते. नॉनवेज खाल्यास आजार होण्याचा धोका जास्त असतो.

श्रावण महिना हा हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात पूजा पाठ करण्याला महत्त्व दिले जाते. याच महिन्यात उपवास धरण्याची परंपरा आहे. ही परंपरा बऱ्याच लोकांच्या कामत येत आहे.