पैसे मिळतात म्हटल्यावर एकाच कुटुंबातले 5-5 जण पीएचडी करतात, अजित पवार यांचं मोठं विधान
अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे, पैसे मिळतात म्हणून एकाच कुटुंबातील पाच -पाच जण पीएचडी करतात असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या विधानामुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

बार्टी, सारथी प्रवेशावर लिमीट येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. एकाच कुटुंबातील 5-5 लोक पीएचडी करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर यावर उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे, पीएचडी करणं म्हणजे पांढरा कागद काळा करण्या एवढं सोपं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्या या विधानानंतर आता राज्यात वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
असे काही विषय निवडले गेलेले आहेत. की प्रश्न पडतो कुठल्या मुलांना लाभ द्यायचा, सध्या अशी स्थिती आहे, की 42 -45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच -पाच जण पीएचडी करतात. मी मधे माहिती घेतली, या ठराविक विद्यार्थ्यांकरता कित्येक शे कोटी रुपये खर्च होत आहेत, आणि त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांवर अतिशय कमी रक्कम खर्च होत आहे. जवळपास 50 टक्के रक्कम ही पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर खर्च होत आहे. त्यामुळे या विषयावर कॅबिनेटमध्ये खूप साधक -बाधक चर्चा झाली, शेवटी कॅबिनेटने आता हा निर्णय घेतला की, आता चीप सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त करायची. आणि साधारण बार्टीच्या किती विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा, सारथीमधून किती विद्यार्त्यांना लाभ द्यायचा त्याला आता आम्ही लिमिट घालणार आहेत, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, माग झालं हे खर आहे, त्यावेळी निवडणुकीचा काळ होता, विद्यार्थी उपोषणाला बसायचे, निवडणुकीच्या काळात कोणाला नाराज नका करू म्हणू द्या, असं ते झालं. दरम्यान दुसरीकडे यावरून आता सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना चांगलाच टोला लगावला आहे, पीएचडी करण्यासाठी काय कष्ट पडतात हे माहिती आहे का? पीएचडी करणं म्हणजे पांढरा कागद काळा करणं इतकं सोप नाही असं अंधारे यांनी म्हटलं आहे.
