AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती तोडण्यासंदर्भात भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

"जेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे मुद्दे नसतात, तेव्हा वेगळा विदर्भ करू असं ते बोलतात. संजय राऊत यांचे वडील आले तरी महाराष्ट्र वेगळा करू शकत नाहीत. मुंबई आणि विदर्भ एक आहेत. वेगळ्या विदर्भाची मागणी आधी होती. पण आता विदर्भ झापाट्याने पुढे येत आहे. संजय राऊत आणि त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे" अशी टीका नवनाथ बन यांनी केली.

BJP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती तोडण्यासंदर्भात भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Image Credit source: PTI
| Edited By: | Updated on: Dec 13, 2025 | 12:36 PM
Share

“गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी मध्ये माकडांचा खेळ सुरु आहे. 52 पत्यांचा जोकर हा संजय राऊत यांच्या पक्षात भरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती महाराष्ट्रला पुढे नेण्याचं कामं करत आहे. तीन पक्षात गोरिला माकडं डान्स करतो आणि माकड एकमेकांना लाथ मारायचं कामं करत आहे, ती हालत आहे” अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली. “खरी सर्कस महाविकास आघाडीच्या तंबूत आहे. महाविकास आघाडीला जनतेले नाकारलय. विरोधी पक्षनेतापद मिळावं इतकही संख्याबळ नाही. विधनासभेला 90 जागांपैकी 20 जागा आल्या. ते दावा करू शकत नाहीत. जनतेने तुम्हाला नाकारलं आहे. त्यामुळे तुम्हाला विरोधपक्षनेते पद दिलं जाऊ शकत नाही” असं नवनाथ बन म्हणाले.

“या आधीच्या प्रथा पायदळी तुडवण्याचं कामं कोणी केलं? आमच्या नेत्यांची घरं, नेत्यांच्या घरी cctv लावण्याच कामं, गिरीश महाजन यांना फसवण्याचं कामं तुमच्या पक्षाने केली. महाराष्ट्र मधल्या प्रथांबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये. विरोधी पक्षनेतापद द्यायचं की नाही हे जनता ठरवते. संजय राऊत यांची लायकी काय आहे? उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पात्रता काय आहे? हे जनतेने दाखवलं आहे” अशा जहरी शब्दात नवनाथ बन यांनी हल्लाबोल केला.

रवींद्र चव्हाण हे RSS चे स्वयंसेवक आहेत

“संजय राऊत यांची खासदारकी संपत आहे. त्यांना माहित आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून जागा मिळणार नाही. केवळ म्हणून ते राहुल गांधी यांची गुलामी करत आहेत. रवींद्र चव्हाण हे RSS चे स्वयंसेवक आहेत. उभ्या हयातीत कधीही शिवसेनेत प्रवेश केला नव्हता” असं नवनाथ बन यांनी सांगितलं.

तो पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही

“ठाकरे बंधू एकत्र आले तरीही त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही. महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल. जिथे नवाब मलिक नेतृत्व करत आहेत, तिथे आम्ही युती करत नाही. जो पर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाहीत तो पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. जर यावरून आम्हाला राष्ट्रवादीशी युती तोडायला लागली तरीही चालेल. भाजप-शिवसेना आम्ही मुंबई महापालिका निवडणुका एकत्रित लढणार आहोत. येत्या 5-6 दिवसात महायुतीचा फॉर्मुला आम्ही जाहीर करू” असं नवनाथ बन म्हणाले.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.