डॉक्टर तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा अन्…त्या टीकेनंतर नवनाथ बन यांचे राऊतांना खुले आव्हान!
संजय राऊत यांनी बोलताना, शिव्या देताना थोडासा विचार करावा. खरं तर संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे का? असा सवाल नवनाथ बन यांनीसंजय राऊत हे आव्हान स्वीकारत नसतील तर त्यांचीच सुंता झालेली आहे, हे महाराष्ट्राला कळून जाईल. 2014 सालानंतर महाराष्ट्र खड्ड्यात गेला असं ते म्हणत आहेत. पण 2014 सालानंतर या देशाला नवं वळण मिळालं, असा पलटवार नवनाथ बन यांनी केला.

Sanjay Raut Vs Navnath Ban : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मांसविक्री बंदीवरून सरकारला धारेवर धरलं. अशा प्रकारच्या बंदीने महाराष्ट्राला नामर्द केलं जातंय, असा आरोप राऊतांनी केला होता. तर राऊतांच्या या टीकेनंतर भाजपाचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले होते. राऊतांनी संतांचा, वारकऱ्यांचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. या मागणीनंतर राऊतांनी बन यांचा चांगलाच समाचार घेतला होता. आता पुन्हा एकदा बन यांनी संजय राऊतांना खुले आव्हान दिले आहे. मी माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहे, तुम्हीही माझ्यासोबत या? असे आव्हानच बन यांनी राऊतांना दिले आहे.
संजय राऊत यांनी बोलताना, शिव्या देताना थोडासा विचार करावा. खरं तर संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे का? हा माझा सवाल आहे. त्यांची वैचारिक सुंताच झालेली आहे, त्यामुळेच त्यांना काँग्रेससोबत जाऊन हलाला करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आज उद्धव ठाकरे गटाची महाराष्ट्रात जी अवस्था झालेली आहे, त्याला संजय राऊत जबाबदार आहेत, असा हल्लाबोल बन यांनी केला.
शिव्या देण्यात संजय राऊतांचा पुरूषार्थ
पुढे बोलताना, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून राऊत यांनी वैचारिक सुंता केलेली आहे. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी वैचारिक सुंता केलेली आहे. पत्रा चाळीत मराठी माणसांची घरे लाटून त्यांनी वैचारिक सुंता केलेली आहे. एवढंच नाही तर विकास करणं हा भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ. महिलेला शिव्या देणं हा भाजपाचा पुरुषार्थ नाही. संजय राऊत यांचा पुरुषार्थ हा शिव्या देण्यात आहे. मराठी माणसाला, मराठी पोराला सुंता झाली आहे का? तो नपुसंक आहे का? असे विचारताना राऊतांनी दहा वेळेस विचार करावा, असा सल्लाही नवनाथ बन यांनी राऊतांना दिला.
नवनाथ बन यांचे राऊतांना खुले आव्हान
नवनाथ बन हा कच्च्या गुरुचा नव्हे तर सच्च्या गुरुचा चेला आहे. ज्या आधुनिक अभिमन्यूने महाविकास आघाडीचं चक्रव्यूह भेदला त्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सच्चा शिपाई आहे. संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावं. ज्या पद्धतीने राऊत भाषा वापरतात ती त्यांना शोभते का? असा सवालही त्यांनी केला. संजय राऊत हे नवनाथ बन यांनी सुंता केलेली आहे का? असं विचारत आहेत. मी राऊतांना आव्हान दोतो की हॉस्पिटल त्यांनी ठरवावे, डॉक्टर त्यांनीच ठरवावे, ठिकाण त्यांनची ठरवावे. मी त्यांच्यासोबत जाऊन माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे संजय राऊत यांनीदेखील माझ्यासोबत येऊन वैद्यकीय तपासणी करावी आणि दोघांच्याही वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र महाराष्ट्राला दाखवावे, असे खुले आव्हानच बन यांनी राऊतांना दिलेय.
जनता राऊतांची भाषा सहन करणार नाही
तसेच, बन यांनी राऊतांना जनताच धडा शिकवेल, असा टोला लगावला. संजय राऊत हे आव्हान स्वीकारत नसतील तर त्यांचीच सुंता झालेली आहे, हे महाराष्ट्राला कळून जाईल. 2014 सालानंतर महाराष्ट्र खड्ड्यात गेला असं ते म्हणत आहेत. पण 2014 सालानंतर या देशाला नवं वळण मिळालं. 2014 सालापूर्वी देश खऱ्या अर्था खड्ड्यात होता. संजय राऊतांनी वारकरी संप्रदायाचा, नाथ परंपरेचा अपमान केला आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. जनता तुमची भाषा सहन करणार नाही, असं नवनाथ बन म्हणाले.
