AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Currency Notes: कशापासून बनते तुमच्या खिशातील नोट? 99 टक्के लोकांचे चुकले उत्तर

Indian Currency Notes: प्रत्येक दिवशी तुम्ही अनेकदा व्यवहार करता, तेव्हा किरकोळ व्यवहारापासून ते मोठ्या व्यवहारापर्यंत नोटा मोजून देतात. पण या नोटा कशापासून तयार होतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Currency Notes: कशापासून बनते तुमच्या खिशातील नोट? 99 टक्के लोकांचे चुकले उत्तर
कशापासून बनते नोट?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 09, 2026 | 3:18 PM
Share

Indian Currency Notes: व्यवहार करताना अनेकदा आपण नोटा हाताळतो. या नोटा अनेकदा हातात घेतो. दुकानात सामान खरेदीसाठी अथवा रिक्षाचे भाडे देताना, मित्रांसोबत नाष्टा करताना नोटांचा वापर आपण करतो. नोटबंदीनंतर काही नवीन नोटा बाजारात आल्या आहेत. जुन्या आणि नवीन नोटा रोजच्या व्यवहारात आहेत. खिशात, वॉलेटमधील नोट ही कशापासून तयार होते? हे अनेकांना माहिती नाही. अनेकांच्या मनात काही तर्क असतात, त्यावरून ही नोट या गोष्टीपासून तयार करण्यात आली आहे असे त्यांना वाटते. पण अनेकांचा हा अंदाज चुकतो.

कागद हे उत्तर तर चूक

अनेकांच्या मनात हा प्रश्न विचारताच उत्तर कागद आले असेल. तर ते उत्तर साफ चुक आहे. 99 टक्के लोक असं चुकीच उत्तर देतात. तुमच्या खिशातील कडकडीत नोटा या कागदापासून तयार होत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, भारतीय चलनी नोटा या कागदापासून नाही तर 100 टक्के कॉटन फायबर म्हणजे कापसापासून तयार होतात. हा कॉटन पेपर सामान्य लाकडापासून तयार झालेल्या कागदपासून वेगळा असतो. त्यामुळेच तुमची नोट अनेक वर्षे इतकी हाताळूनही लवकर खराब होत नाही. ती लवचिक असते. टिकाऊ ठरते.

अशा तयार होतात नोटा

सामान्य कागदात मुख्यतः लाकडाच्या लगद्यापासून तयार केलेल्या कागदाचा वापर होतो. हा कागद स्वस्त असला तरी फार टिकाऊ नसतो. तर चलनी नोटांसाठी वापरला जाणारा कॉटन पेपर हा कापसापासून तयार करण्यात येतो. काही नोटांमध्ये 75 टक्के कॉटन आणि 25 टक्के लिनेनचा वापर करण्यात येतो. पण RBI च्या अधिकृत माहितीनुसार नोटा तयार करण्यासाठी 100 टक्के कापसाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे नोट टिकाऊ राहते.

कुठे छापल्या जातात नोटा?

नोटा छापण्याची प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि अत्याधिक सुरक्षित कारखान्यात होते. भारतात चार ठिकाणी मुख्यतः नोटा छापण्यात येतात. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक, मध्य प्रदेशातील देवास, पश्चिम बंगालमधील सल्बोनी आणि कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील प्रिंटिंग प्रेसचा समावेश आहे. येथे कापसापासून पेपर शीट्स तयार होऊन नोटा छापल्या जातात. याठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असते.

नोटा बदलण्यासाठी आरबीआयचे (RBI)काही नियम आहे. या नोटावर आरबीआयच्या गव्हर्नरचे हस्ताक्षर, गांधीजीचा वॉटरमार्क आणि श्रेणी क्रमांक बघणे आवश्यक आहे. जर नोटांवर हे सुरक्षा मानक असतील तर बँक नोट बदलून देतात.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक