
मंगळवारी 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजेत्यांचा सत्कार केला. या सोहळ्यादरम्यान राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी पांढऱ्या गणवेशातील एक महिला अधिकारीही दिसली. राष्ट्रपतींच्या सुरक्षेत तैनात असलेले अधिकारी कधीकधी गडद हिरव्या किंवा कधीकधी पांढऱ्या गणवेशात दिसतात, हे तुम्ही अनेकदा पाहिले असेलच. पण त्यामागील कारण काय आहे, तुम्हाला माहीत आहे का ? चला जाणून घेऊया..
राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका माजी अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, राष्ट्रपतींच्या सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये लष्करी कर्मचारी देखील समाविष्ट असतात. हे अधिकारी, सुरक्षा प्रोटोकॉलनुसार वेळापत्रकानुसार बदलत असतात. कधी लष्कर, कधी हवाई दल तर कधी नौदलाचे अधिकारी, गार्ड म्हणून राष्ट्रपतींसोबत असतात.
म्हणून बदलतो यूनिफॉर्मचा रंग
राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले हे गार्डस, लष्कर, नौदल किंवा हवाई दलातील मेजर पदाचे असतात. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना ते औपचारिक ड्रेस कोडचे पालन करतात. या काळात ते त्यांच्या विंग आणि रेजिमेंटनुसार गणवेश घालतात. म्हणूनच राष्ट्रपतींसोबत दिसणारे अधिकारी कधी पांढऱ्या रंगात तर कधी गडद हिरव्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात.
दरम्यान राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेत पहिल्यांदाच बदल करण्यात आला आहे आणि आता महिला अधिकारी त्यांच्या पीएसओ म्हणून काम पाहत आहेत. सध्या, सीआरपीएफ सहाय्यक कमांडंट पूनम गुप्ता या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पीएसओ आहेत.
चेंज ऑफ गार्डच्या माध्यमातून दर आठवड्याला बदलतात अंगरक्षक
पारंपारिकपणे, राष्ट्रपतींची सुरक्षा हे पीबीजी अर्थात राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांकडून केली जाते, त्यांना संरक्षण दिले जाते, जे सैन्यातील सर्वात जुने रेजिमेंट आहे. त्यामुळे पीबीजी हे नेहमीच राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पारंपारिक गणवेशात दिसतात. चेंज ऑफ गार्ड परंपरेनुसार, राष्ट्रपतींचे अंगरक्षक दर आठवड्याला बदलले जातात.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची पूर्ण यादी (national film awards 2025 full winners list )
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन
सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू
सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- भागावान्थ केसरी
सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पार्किंग
सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म- गॉडडे गॉडडे चा
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- श्यामची आई
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कथल
सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा- वश
सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा- डीप फ्रीजर
सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा- हनूमान
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)
सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- अॅनिमल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव
सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- उर्वशी, जानकी बोडीवाला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, (जवान) आणि विक्रांत मेसी, (12th फेल)
सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- नाळ २
सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक- आशीष भेंडे (आत्मपॅम्फलेट)
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म- 12th फेल