देशात पहिलं आधार कार्ड कुणाला मिळालं? उत्तर ऐकून थक्क व्हाल!

आज आपल्या जीवनात आधार कार्ड अत्यावश्यक बनलंय, पण तुम्हाला माहितीय का, देशातील पहिलं आधार कार्ड नेमकं कोणाला मिळालं होतं? एखाद्या मोठ्या शहरातील व्यक्तीला नाही, तर एका छोट्याशा गावातील सामान्य महिलेच्या हाती इतिहास घडला! कोण आहे ती व्यक्ती?

देशात पहिलं आधार कार्ड कुणाला मिळालं? उत्तर ऐकून थक्क व्हाल!
aadhar card news
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 3:11 PM

आधार कार्ड हे आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. बँकेत खातं उघडणं, सिम कार्ड घेणं किंवा सरकारी योजनेचा लाभ घेणं असो, सर्वत्र आधार कार्डची गरज भासते. पण अभिमानाची गोष्ट अशी की, भारतातलं पहिलं आधार कार्ड आपल्या महाराष्ट्रातील एका महिलेच्या नावावर नोंदवलं गेलं होतं.

नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली या लहान गावात राहणाऱ्या रंजना सोनवणे यांना २९ सप्टेंबर २०१० रोजी भारतातलं पहिलं आधार कार्ड देण्यात आलं. हा ऐतिहासिक क्षण फक्त त्यांच्या दृष्टीनेच नाही, तर महाराष्ट्रासाठीही अभिमानाचा विषय ठरला. आज या कार्डाचा वापर देशभरातील कोट्यवधी लोक करीत आहेत.त्यामुळेच प्रत्येक नागरिकासाठी आपलं आधार कार्ड वेळोवेळी अपडेट ठेवणं आवश्यक ठरतं.

Ranjana Sonawane was the first person to receive an Aadhaar card on September 29, 2010

Ranjana Sonawane was the first person to receive an Aadhaar card on September 29, 2010

UIDAI ( भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) ने नुकतीच सूचना दिली आहे की, जर एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड काढून १० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल आणि या दरम्यान त्यात कोणतंही अपडेट केलं नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर ते अपडेट करणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात काही सेवांचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात.

अपडेट करणं अगदी सोपं

आधार कार्ड अपडेट करणं अगदी सोपं आहे. तुम्ही UIDAI च्या ‘MyAadhaar’ पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता अपडेट करू शकता. यासाठी फक्त ₹५० शुल्क आकारलं जातं. मोबाईल नंबर, ईमेल, फोटो किंवा बायोमेट्रिक्स अपडेट करायचे असल्यास, जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागतं, जिथे साधारणपणे ₹५० ते ₹१०० शुल्क आकारलं जातं.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला SRN ( Service Request Number ) मिळतो, ज्याच्या मदतीने तुम्ही अर्जाचं स्टेटस ट्रॅक करू शकता. साधारणपणे काही दिवसांपासून ते ३० दिवसांत आधार अपडेट होतं आणि त्यानंतर तुम्ही नवीन कार्ड डाउनलोड करू शकता किंवा पोस्टाने घरी मागवू शकता. त्यामुळे जर तुमचं आधार अपडेट नसेल, तर आजच ही प्रक्रिया पूर्ण करा!