अफगाणिस्तान आणि महाभारताचं अनोखं कनेक्शन, गांधारचं कंधार कसं झालं?

अफगाणिस्तानचा संबंध महाभारताशी असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. अफगाणिस्तानालीत पेशावरच्या डोंगर रांगा, काबुल नदी काठचा परिसरात महाभारताचा इतिहास दडलेला आहे.

अफगाणिस्तान आणि महाभारताचं अनोखं कनेक्शन, गांधारचं कंधार कसं झालं?


काबूल : सध्या अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र हजारो वर्षांपूर्वी प्राचीन काळात अफगाणिस्तान असा नव्हता. अफगाणिस्तानचा संबंध महाभारताशी असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. अफगाणिस्तानालीत पेशावरच्या डोंगर रांगा, काबुल नदी काठचा परिसरात महाभारताचा इतिहास दडलेला आहे. 2013 मध्ये आशिया-आफ्रिकेतील अभ्यासात अफगाणिस्तानशी महाभारताचे नाते असल्याचे स्पष्ट होते.

आजचं कंधार एकावेळचं गांधार

अनेक तज्ज्ञांच्या मते गांधार साम्राज्य सध्या कंधार नावाने ओळखले जाते. गांधारचा मोठा भाग उत्तर पाकिस्तान आणि पूर्व अफगाणिस्तानात आहे. गांधार साम्राज्य पोथोहार, पेशावरा घाट आणि काबुल नदीपर्यंत पसरलेले होते. गांधार शब्दाचा उल्लेख ऋगवेद, उत्तर रामायण आणि महाभारतात मिळतो. गंध म्हणजे सुगंध म्हणजे सुगंधाची जमीन असा होतो. गांधार हे महादेवाचे एक नाव असल्याचेही बोलले जाते. इतिहासकारांच्या मते उत्तर पश्चिम पंजाबचा भागही एकेकाळी गांधारचा भाग होता. महाभारत काळात गांधार हे एक वैभवशाली साम्राज्य होते.

शकुनीच्या हातात गांधारची सत्ता

जवळपास 5 हजार 500 वर्षांपूर्वी सुबाला हे पहिले गांधारचे राजे होते. त्यांच्या मुलीचे नाव गांधारी होते आणि तिचे लग्न हस्तिनापुरचे राजकुमार धृतराष्ट्रासोबत झाले. सुबाला यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पूत्र शकुनी याच्याकडे गांधारची सत्ता आली. महाभारताचे युद्ध हरल्यावर काही कौरव वंशज गांधारमध्ये राहायला गेल्याचे बोलले जाते.

गांधारीला दुर्योधनसह 100 मुलं असल्याची आख्यायिका आहे. त्यांना कौरव या सामूहिक नावानं ओळखलं जातं. महाभारताच्या युद्धात कौरवांचा पांडवांकडून पराभव झाला. त्यानंतर कौरववंशाचे अनेक लक गांधारमध्ये राहू लागले. नंतर हळूहळू ते इराक आणि सौदी अरबला गेल्याचंही बोललं जातं.

नंतरच्या काळात या भागावर मौर्य राजांचं साम्राज्य होतं. या काळात या भागात बौद्ध धर्माचा मोठा प्रसार झाला. यानंतर येथे मुघलांचा हल्ला झाला. गजनीने 11 व्या शतकात या भागावर ताबा मिळवला. यानंतर अफगाणिस्तानमध्ये जे झालं त्याचा पुन्हा एक वेगळा इतिहास आहे. पुढे ब्रिटिशांनीही या भागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, नंतर सोव्हिएत युनियनचं सैन्य अफगाणमध्ये घुसलं, मग तालिबानची सत्ता, मग अमेरिकेने सैन्य कारवाई करत या भागावर नियंत्रण मिळवलं आणि आता पुन्हा तालिबान सत्तेत आलाय.

5 हजार वर्षांपूर्वीचे विमान

काही वर्षांपूर्वी तालिबान आणि दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात होते. यावेळी एका गुहेमध्ये एक विमान सापडलं आणि हे विमान 5 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावाही केला जातो.

हेही वाचा :

“आधी गोळ्या झाडल्या, मग फरफटत नेलं आणि गाडीखाली चिरडलं”, पत्रकार दानिश सिद्दीकींच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा

Exclusive: पाकिस्तानची पोलखोल, TV9 च्या मुलाखतीत अफगाणिस्तानमधील तालिबान्याचे धक्कादायक खुलासे

प्रसिद्ध कॉमेडियनच्या मृत्यूचा Video व्हायरल, तालिबानने हत्येची जबाबदारी घेतली, कारण काय?

व्हिडीओ पाहा :

Know about connection between Afghanistan with Mahabharat Gandhar kingdom

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI