
मुंबई : प्रत्येक जण कमावतो आणि आपल्या भविष्यासाठी देखील तशी व्यवस्था करुन ठेवतो. कोणतेही काम करताना डॉक्यमेंटेशन खूप महत्त्वाचे असते. जर तुम्ही प्रत्येक महत्त्वाचा कागदपत्र व्यवस्थित जतन करुन ठेवला तर तुम्हाला भविष्यात कधीच कोणताही त्रास होत नाही. डॉक्यमेंटेशनमध्ये अनेक जण हे चालढकलपणा करतात किंवा आळशी असतात. पण असे करु नये. आपल्या पश्चात इतर घरातील व्यक्तींना देखील तुम्ही याबाबत माहिती दिली पाहिजे. तुमचे बँक अकाऊंट, तुमच्या पॉलिसी किंवा इतर कोणतीही गुंतवणूक तुम्ही केली असेल तर त्याची माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला देखील दिली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असायला पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहेत.
प्रत्येक जोडप्याचे एक तरी संयुक्त बँक खाते असणे आवश्यक आहे. जॉईंट अकाऊंटद्वारे, पती-पत्नी दोघेही आवश्यकतेनुसार पैशाशी संबंधित व्यवहार सहजपणे करू शकतात. या खात्याच्या अटी व शर्ती दोघांनाही स्पष्ट असाव्यात.
अनेकांचे लग्न होऊन अनेक वर्ष झाले आहे. पण अनेकांकडे लग्नाचा दाखलाच नाही. पण हे एक अतिशय महत्त्वाचा कागदपत्र आहे. प्रत्येक विवाहित जोडप्याकडे विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा विवाह कायदेशीररित्या वैध होतो. संयुक्त खाते, संयुक्त कर्ज, पासपोर्ट, प्रवास व्हिसा किंवा कोणत्याही कायमस्वरूपी निवासासाठी अर्ज करण्यासाठी विवाह प्रमाणपत्र खूप महत्वाचे आहे.
एक जबाबदार व्यक्ती म्हणून भविष्यात कोणतीही अनपेक्षित घटना घडली तर तुमच्या जोडीदाराला मदत कशी मिळेल. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने जीवन विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या जोडीदाराला कठीण काळात आर्थिक सुरक्षा मिळेल.
तुम्ही हयात नसल्यास तुमच्या मालमत्तीचा वारसा कोणाला मिळेल हे विल खात्री देते. प्रत्येकाने मृत्युपत्राद्वारे, हे सुनिश्चित करू शकतात की त्यांच्या इच्छेचा आदर केला जाईल आणि त्यांच्या प्रिय व्यक्ती गेल्यानंतरही त्यांची काळजी घेतली जाईल.
जर पती-पत्नीने मिळून मालमत्ता खरेदी केली असेल तर दोघांनीही ही कागदपत्रे जपून ठेवावीत. या कागदपत्रांमध्ये खरेदी करार, टायटल डीड, कर्जाची कागदपत्रे आणि नोंदणी प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे. मालमत्ता हस्तांतरण, कर्ज आणि इतर अनेक कायदेशीर बाबींमध्ये ही कागदपत्रे आवश्यक असतात.