AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : दोन किंवा अधिक पीएफ अकाऊंट ऑनलाइन मर्ज कसे करावे, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

तुम्ही कंपनी बदलल्यानंतर तुमचे पीएफ अकाऊंट जर मर्ज केले नसेल तर ते मर्ज करुन घ्या. यूएएन नंबर जरी एकच असला तरी प्रत्येक कंपनी वेगळे अकाऊंट तुमच्या नावाने उघडते. ज्यानंतर तुम्हाला तुमचा जुना पीएफ अकाऊंट नव्या अकाऊंट मध्ये मर्ज करावे लागेल. जाणून घ्या कसे करावे अकाऊंट मर्ज.

EPFO : दोन किंवा अधिक पीएफ अकाऊंट ऑनलाइन मर्ज कसे करावे, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
| Updated on: Feb 15, 2024 | 7:54 PM
Share

Merge PF Accounts Online : तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर तुमचे पीएफ अकाऊंट नक्कीच असेल. आजपर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी नोकरी केली असेल. नोकरी बदलल्या नंतर जेव्हा तुम्ही एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाता तेव्हा कंपनीकडून तुमचे ईपीएफ खाते उघडले जाते. बऱ्याच वेळा अनेकांना असा गैरसमज असतो की जर त्याचा UAN नंबर एक असेल तर त्याचे EPF खाते देखील एकच असेल. पण असे नसते. नोकरी बदलल्यानंतर नवीन कंपनी तुमचे नवीन खाते उघडते. त्यामुळे तुम्हाला ते अकाऊंट मर्ज करावे लागेल तर सगळे पैसे एकाच खात्यावर येतील.

तुमच्याकडे एकच UAN  असला तरी त्या अंतर्गत अनेक EPF अकाऊंट असू शकतात. जो पर्यंत तुम्ही सर्व खाती एकत्र करत नाही तो पर्यंत पासबूकमध्ये तुम्हाला सर्व रक्कम एकत्र दिसणार आहे. जर तुम्हाला तुमचे EPF खाते विलीन करायचे असेल, तर तुम्ही ही प्रक्रिया घरी बसून सहज पूर्ण करू शकता. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत.

ईपीएफ खाते विलीन करण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम तुम्ही EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/ वर जा.
  2. सेवा (Service) विभागात जा आणि कर्मचाऱ्यांसाठी (For Employees) वर क्लिक करा.
  3. यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला One Employee – One EPF खाते या पर्यायावर जावे लागेल.
  4. यानंतर, नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करावे लागेल.
  5. यानंतर, जे पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला जुन्या ईपीएफ खात्याची माहिती दिसेल.
  6. त्यानंतर EPF खाते क्रमांक टाका आणि सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुमचा ईपीएफ खाते मर्ज अर्ज पूर्ण होईल.
  7. तुमच्या वर्तमान नियोक्त्याला ते मंजूर करावे लागेल. त्यानंतर EPFO ​​तुमचे जुने खाते नवीन खात्यात विलीन करेल.

UAN सक्रिय असणे आवश्यक

ईपीएफ खाते विलीन करण्यासाठी आधी तुमचा UAN क्रमांक सक्रिय (Active) करणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला तुमचा UAN नंबर माहित नसेल तर तुम्ही ते देखील शोधू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तळाशी उजव्या बाजूला, तुम्हाला महत्वाच्या लिंक्समध्ये तुमचे UAN जाणून घ्या हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा, तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा प्रविष्ट करा आणि विनंती OTP वर क्लिक करा.

OTP द्वारे पडताळणी पूर्ण केल्यानंतर, एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, आधार/पॅन/सदस्य आयडी आणि कॅप्चा इत्यादी तपशील भरावा लागतील. त्यानंतर Show My UAN Number वर क्लिक करा, तुमचा UAN तुमच्या समोर असेल.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.