
परदेशात प्रवास करण्याचे स्वप्न कोण पाहत नाही? पण बऱ्याचदा लोकं परदेश प्रवास करताना होणारा खर्च लक्षात घेता प्रवास करणे टाळतात. मात्र गेल्या काही वर्षांत भारतीयांमध्ये परदेशात प्रवास करण्याचा ट्रेंड वाढत आहे. जर तुम्हालाही कमी बजेटमध्ये परदेशात प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे अनेक उत्तम ठिकाणांचा पर्याय आहे. खास गोष्ट म्हणजे येथे जाण्यासाठी तुम्हाला लाखो रूपये खर्च करण्याचीही गरज भासणार नाही. तर आजच्या या लेखात आपण अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही 40 ते 50 हजारांच्या बजेटमध्ये भेट देऊ शकता. यामध्ये विमान प्रवास, हॉटेल, जेवण आणि पर्यटनाचा खर्च देखील सहज करता येणार आहे. चला तर त्या ठिकाणांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
नेपाळ हे फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. कारण तुम्ही कमी बजेटमध्ये स्वस्त प्रवास करू शकता. तर तुम्ही येथे चार ते पाच दिवसांसाठी नेपाळ फिरायला जाऊ शकतात. यासाठी किमान 35 ते 40 हजार रूपये खर्च येऊ शकतो. नेपाळला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च हा आहे. यामध्ये विमान प्रवास, हॉटेल, जेवण आणि पेये आणि पर्यटनाचा खर्च समाविष्ट आहे.
कझाकस्तान हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करू शकता. तसेच तुम्हाला येथे कोणत्याही व्हिसाच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. तुम्ही जून ते सप्टेंबर पर्यंत येथे जाऊ शकता. विमान प्रवास आणि खाणे पिणे तसेच फिरण्याचा एकूण खर्च 40 हजारांपर्यंत होऊ शकतो.
तुम्ही 35 ते 40 हजारांच्या बजेटमध्ये भूतानलाही भेट देऊ शकता. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर आहे. जर तुम्हाला शांतता हवी असेल आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर तुम्ही येथे जाऊ शकता. येथे जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाचीही आवश्यकता नाही.
व्हिएतनाम आपल्या सुंदर समुद्रकिनारे आणि नद्यांसाठी प्रसिद्ध आहे. या देशाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे चलन. .तुम्ही येथे 10 हजार भारतीय चलन देऊन लाखो रुपयांचा आनंद घेऊ शकता. तुम्ही मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांत येथे जाऊ शकता.
दोन ते तीन महिने आधीच तिकिटे बुक करा.
गर्दीच्या काळात जाणे टाळा.
ट्रॅव्हल अॅप्स वापरून स्वस्त फ्लाइट आणि हॉटेल्स शोधा.
स्थानिक बस, ट्रेन आणि स्ट्रीट फूडचा आनंद घ्या.