मालदीव नव्हे, जगातील या देशात येतात सर्वाधिक पर्यटक; अब्जावधींची कमाई

मालदीव सध्या चर्चेत आहे. अनेक भारतीय मालदीवला भेट देण्यासाठी जातात पण तुम्हाला माहीत आहे का की मालदीव ही पर्यटकांची पहिली पसंती नाही.

मालदीव नव्हे, जगातील या देशात येतात सर्वाधिक पर्यटक; अब्जावधींची कमाई
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 2:52 PM

Tourism :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो शेअर केले. मात्र त्यावर मालदीवमधील मंत्र्यांनी केलेल्या टीप्पणीमुळे वाद सुरू झाला. त्या मंत्र्याच्या एका चुकीमुळे संपूर्ण देशाच्या पर्यटनाला फटका बसला आहे. भारत वि. मालदीव असा वाद सुरू झाल्यानंतर #Boycott Maldives हा ट्रेंड सुरू झाला. अनेक पर्यटकांनी तर मालदीवला जाणं रद्द करून लक्षद्वीपला जाण्याचा प्लान आखला आहे. या सर्व गोष्टींचा मालदीव टूरिजमला मोठा फटका बसला आहे. भारत काय किंवा जगभरातील इतर देशातील टूरिस्ट, सुट्टीसाठी मालदीवला सर्वाधिक जात असतील असं तुम्हाला वाटत असेल तर चूक आहे. अनेक पर्यटक मालदीवची निवड करतात हे खरं आहे पण सर्वाधिक टूरिस्ट हे फिरायला मालदीवला नव्हे तर दुसरीकडेच जातात.

भारतातून सर्वाधिक पर्यटक कुठल्या देशात जातात ?

भारतात मालदीवची खूप क्रेझ आहे, पण बहुतेक भारतीय पर्यटक फिरायला हे मालदीवला नाही तर दुबईला जातात. ग्लोबल ट्रॅव्हल मार्केट प्लेस स्कायस्कनर नुसार, 2023 मध्ये, बहुतेक भारतीय हे फिरण्यासाठी मालदीवला नाही तर दुबईला गेले. गेल्या वर्षी दुबईने सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणून आपले स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. आधुनिक लक्झरी आणि जागतिक स्तरावरील प्रवासाच्या आकर्षणांमुळे दुबई अव्वल स्थानावर आहे. 2023 मध्ये सर्वाधिक भारतीय पर्यटकांनी दुबईला भेट दिली आहे.

तर या यादीत बँकॉक हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. सांस्कृतिक समृद्धी आणि उर्जेसाठी ओळखल्या जाणार्‍या बँकॉकने 2023 मध्ये बरेच पर्यटकांना आकर्षित केले. याशिवाय जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळाबद्दल बोलायचे झाले तर त्यात पहिले नाव येते फ्रान्सचे. दरवर्षी सुमारे 8.9 कोटी लोक फ्रान्समध्ये भेट देण्यासाठी येतात. पॅरिसमधील आयफेल टॉवर पाहण्यासाठी बहुतेक लोक येथे जातात. फ्रान्सला पर्यटनातून अंदाजे 62 अब्ज डॉलर्स मिळतात.भारतातून जाणाऱ्या पर्यटकांमुळे मालदीवची चांगली कमाई होते, पण याचा अर्थ असा नाही की भारतातील सर्वाधिक पर्यटक मालदीवलाच जातात.

Non Stop LIVE Update
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.