PPF Vs SIP, कुठे अधिक परतावा मिळेल, जाणून घ्या

पीपीएफ आणि एसआयपी हे दोन्ही गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कुठे गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊया.

PPF Vs SIP, कुठे अधिक परतावा मिळेल, जाणून घ्या
PPF and SIP are both excellent options for investment see details here
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 30, 2025 | 1:33 AM

तुम्हाला गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय खुले आहेत. पण, नेमकी गुंतवणूक कुठे करावी, हा प्रश्न अनेकांचा असतो. कारण, वेगवेगळे पर्याय असल्याने अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी योग्य मार्ग माहिती असणं गरजेचं आहे. पीपीएफ आणि एसआयपी हे दोन्ही गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला याचविषयी माहिती सांगणार आहोत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या मासिक उत्पन्नातील काही भाग वाचवून गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणुकीतून तुम्ही तुमचे भविष्य तर सुरक्षित करताच, शिवाय चांगला फंडही गोळा करता. गुंतवणुकीसाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. एफडी, पोस्ट ऑफिस स्कीम असे अनेक पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ स्कीम आणि एसआयपीबद्दल सांगणार आहोत.

पीपीएफ आणि एसआयपी हे दोन्ही गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहेत, जिथे तुम्ही थोडी रक्कम गुंतवू शकता आणि चांगला फंड जमा करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दोन पैकी कोणत्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि जास्त निधी गोळा करू शकता. चला जाणून घेऊया.

पीपीएफमध्ये 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा

जर तुम्ही पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेत 15 वर्षांसाठी दरमहा 1000 रुपये म्हणजेच दरवर्षी 12,000 रुपये गुंतवत असाल तर तुम्ही पीपीएफ योजनेत एकूण 1,80,000 रुपयांची गुंतवणूक कराल. पीपीएफ योजना 7.1 टक्के दराने परतावा देते. यामध्ये मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 3,15,000 रुपये मिळतील. येथे तुम्हाला 1.45 लाख रुपयांचा नफा मिळेल.

एसआयपीमध्ये 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर परतावा

जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवले आणि ते 15 वर्ष चालू ठेवले तर तुमची एकूण गुंतवणूक 1,80,000 रुपये होईल. 12 टक्के परतावा मिळाल्यास 15 वर्षांनंतर तुम्हाला 4,75,931 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला एकूण 2,95,931 रुपयांचा फायदा मिळणार आहे.

म्युच्युअल फंड एसआयपीसह रिटायरमेंट फंड तयार करा

एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हळूहळू लोकांमध्ये खास होत आहे. म्युच्युअल फंड एसआयपीत दरमहिन्याला थोडी फार गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करू शकता. तुम्हाला तुमची गुंतवणूक दीर्घकाळ सुरू ठेवावी लागते.

म्युच्युअल फंड एसआयपीतून तीन कोटींचा निधी

आता 25 वर्षांचे असाल तर तुम्ही तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग आतापासूनच सुरू केले पाहिजे. म्युच्युअल फंड एसआयपीची खासियत यात तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागत नाही, थोडीशी गुंतवणूक करावी लागते. जर रोज 100 रुपयांची बचत केली आणि म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही 3 कोटी रुपयांपर्यंतचा फंड जोडू शकता.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)