फक्त एक उपाय, साप आयुष्यभर कधीच घराभोवती दिसणार नाही, एकदा नक्की ट्राय करा
पावसाळ्याच्या तोंडावर घराच्या आसपास साप येत असतील फक्त घरगुती पद्धतीने बनवा एक स्प्रे. आयुष्यभर परत कधीच घराच्या आसपास देखील साप दिसणार नाही.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घराच्या आजूबाजूला किंवा बागेत साप दिसणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, अचानक साप दिसल्यावर घाबरणे स्वाभाविक असले तरी योग्य माहिती आणि खबरदारी घेतली तर ही परिस्थिती सहज हाताळता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, साप दिसल्यास सुरक्षित अंतर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि स्वतःहून साप पकडण्याचा प्रयत्न टाळावा. गरज भासल्यास रेस्क्यू टीमला संपर्क करणेच योग्य ठरते.
पावसाळ्यात ओलावा, झाडी आणि लपण्यासाठी जागा मिळाल्यामुळे साप बागांकडे आकर्षित होतात. त्यामुळे घराजवळील परिसर स्वच्छ ठेवणे. गवत-झाडांची वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक आहे.
नेफ्थलीनचा वापर – प्रभावी उपाय
नेफ्थलीनच्या गोळ्यांचा वापर सापांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. हे तयार करण्यासाठी तुम्हाला 4-5 नेफ्थलीन गोळ्या बारीक करून घ्याव्या लागतील. त्यात 1-2 कप पाणी मिसळावे लागेल. तयार द्रावण बागेत, झाडांवर आणि घराच्या आसपास फवारा. याच्या तीव्र वासामुळे साप त्या भागापासून दूर राहतात. मात्र, हे द्रावण मुलांच्या हातापासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
अमोनियाची तीव्र वास – सापांना असह्य
अमोनियाचा वास साप सहन करू शकत नाहीत. हे तयार करण्यासाठी 2-3 मोठे चमचे अमोनिया 1-2 कप पाण्यात मिसळा. स्प्रे बाटलीत भरून बागेत फवारणी करा. यामुळे साप आणि इतर कीटक दूर राहण्यास मदत होते.
लवंग आणि दालचिनी तेलाचा उपयोग
लवंग आणि दालचिनीच्या तेलाचा वासही सापांना दूर ठेवतो. 2 चमचे लवंग तेल + दालचिनी तेल. 3 कप पाण्यात मिसळून स्प्रे तयार करा. हे मिश्रण बागेत फवारल्यास सापांसोबतच कीटकांची समस्याही कमी होते.
घरगुती मिश्रणही उपयुक्त
सिरका, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण तयार करून फवारणी केल्यास साप दूर राहण्यास मदत होते. योग्य काळजी आणि साध्या उपायांनी सापांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. लक्षात ठेवा, घाबरण्यापेक्षा सजग राहणं आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे.